Tablets Under rs. 15,000: चुटकीसरशी होतील सर्व कामे, विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम 5 टॅब्लेट्स

Tablets Under rs. 15,000: चुटकीसरशी होतील सर्व कामे, विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम 5 टॅब्लेट्स
HIGHLIGHTS

Amazon वर 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत अनेक टॅब्लेट मिळतील.

आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम अशा 5 टॅब्लेट्सची यादी तयार केली आहे.

तुम्हाला टॅब्लेट्सच्या खरेदीवर 2,000 रुपयांपर्यंत सूट देखील मिळेल.

Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल संपला असेल तरीही काही काळजी करू नका. ई-कॉमर्स वेबसाइट अजूनही अनेक इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सवर चांगल्या ऑफर देत आहे. तुम्हाला खास विद्यार्थ्यांसाठी टॅब्लेट्स हवे असतील तर आम्ही Amazon वर 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत अनेक टॅब्लेट मिळतील. एवढेच नाही, तर तुम्हाला त्यावर 2,000 रुपयांपर्यंत सूट देखील मिळेल. या रिपोर्टमध्ये आम्ही अशाच काही खास टॅब्लेट्सची यादी तयार केली आहे. 

Lenovo Calling Tab M8 2nd Gen

किंमत:  8,790 रुपये 

 या टॅबलेटमध्ये 2GB रॅम आणि 32GB इंटर्नल स्टोरेजचा सपोर्ट आहे. या टॅबलेटचे स्टोरेज 128GB पर्यंत वाढवता येईल. या टॅबलेटमध्ये 8.0-इंच लांबीचा डिस्प्लेसह  MediaTek Helio A22 प्रोसेसर आहे. हे प्रोसेसर हे कोणत्याही समस्यांशिवाय बहुतांश गेम हाताळू शकते. HDFC बँकेच्या कार्डवरून पेमेन्ट व्यवहार केल्यास 2,000 रुपयांची सूट मिळेल.

Samsung Galaxy Tab A 8.0

किंमत: 9,999 रुपये 

या टॅबलेटमध्ये 8.0-इंच लांबीचा डिस्प्ले उपलब्ध आहे. डिवाइस क्वालकॉमच्या प्रोसेसरवर काम करते. वरील टॅबलेटप्रमाणे HDFC बँकेच्या कार्डवरून खरेदी केल्यास 2,000 रुपयांची सूट मिळेल. या टॅबलेटमध्ये 2GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेजचा सपोर्ट आहे. या टॅबलेटचे स्टोरेज 512GB पर्यंत वाढवता येऊ शकते. 

elevn eTab Max

किंमत: 11,990 रुपये 

या टॅबलेटमध्ये 10.1-इंच लांबीचा डिस्प्ले उपलब्ध आहे. या टॅबलेटवर उपलब्ध असलेल्या ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँकेच्या कार्डवरून खरेदी केल्यास 2,000 रुपयांची सूट मिळेल. या टॅबलेटमध्ये 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट आहे. या टॅबलेटचे स्टोरेज 128GB पर्यंत वाढवता येऊ शकते. 

Alcatel 3T10

किंमत: 14,500 रुपये

या टॅबलेटमध्ये 10.0-इंचाचा डिस्प्ले उपलब्ध आहे. HDFC बँकेच्या कार्डवरून खरेदी केल्यास 2,000 रुपयांची सूट मिळेल. या टॅबलेटमध्ये 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट आहे. या टॅबलेटचे स्टोरेज 128GB पर्यंत वाढवता येऊ शकते. 

IKALL N15

किंमत: 10,990 रुपये 

या टॅबलेटमध्ये 10.0-इंच लांबीचा डिस्प्ले उपलब्ध आहे. त्याच्या मागील बाजूस 13MP कॅमेरा आणि 8MP सेल्फी कॅमेरा मिळेल. HDFC बँकेच्या कार्डवरून खरेदी केल्यास 2,000 रुपयांची सूट मिळेल. या टॅबलेटमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट आहे. या टॅबलेटचे स्टोरेज 128GB पर्यंत वाढवता येऊ शकते. 

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo