सावधान! तुम्हाला e-PAN कार्ड डाउनलोड संबंधित ईमेल आलाय का? चुकूनही ‘ही’ चूक करू नका, अन्यथा..

सावधान! तुम्हाला e-PAN कार्ड डाउनलोड संबंधित ईमेल आलाय का? चुकूनही ‘ही’ चूक करू नका, अन्यथा..
HIGHLIGHTS

तुम्ही e-PAN कार्ड डाउनलोड करण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा.

तुम्हाला एक Email रिसीव झाला आहे, ज्यामध्ये e-PAN कार्ड डाउनलोड करण्यासाठी सांगितले आहे.

PIB Fact Check ने ऑफिशियल अकाउंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे.

PAN कार्ड तुमच्या महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे. तुमच्या अनेक महत्त्वाच्या सरकारी कामात तसेच तुमचे ओळखपत्र म्हणून हा कार्ड महत्त्वाची भूमिका बजावतो. मोबाईलमध्ये कागदपत्रे आणि ओळखपत्र इत्यादी ठेवणे, आता अगदी सामान्य झाले आहे. कारण, तुम्हाला कुठेही कोणत्याही क्षणी त्यांची गरज भासू शकते. मात्र, सध्या जर तुम्ही e-PAN कार्ड डाउनलोड करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला येथे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

खरं तर, PIB Fact Check ने ऑफिशियल X (पूर्वीच्या ट्विटर) अकाउंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये, त्यांनी नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी पोस्टमध्ये सांगितले आहे की, तुम्हाला एक Email रिसीव झाला आहे, ज्यामध्ये e-PAN कार्ड डाउनलोड करण्यासाठी सांगितले आहे. हा इमेल फेक असल्याचे PIB ने दावा केला आहे.

Also Read: IRCTC Super App: नव्या ऍपमध्ये रेल्वे तिकीट बुकिंगसह मिळतील अनेक महत्त्वाच्या सर्व्हिस, पहा बेनिफिट्स

PIB Fact Check च्या पोस्टमधील दावे

पुढे PIB Fact Check च्या पोस्टमध्ये अनेक दावे करण्यात आले आहेत. “हा ईमेल खोटा आहे, अशा कोणत्याही ईमेलला प्रतिसाद देऊ नका, असा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. तसेच, तुम्ही कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये, कॉल किंवा SMS ला देखील प्रतिसाद देऊ नका. दरम्यान तुमची वैयक्तिक माहिती आणि बँकिंग डिटेल्स इ. शेअर करू नका.

पोस्टमध्ये मोठ्या प्रमाणात सावध राहण्याचा इशारा दिला गेला आहे. चुकूनही, या इमेल्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास हे तुमचे बँक खाते देखील काढून घेऊ शकते, असे सांगितले गेले आहे. यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान देखील होण्याची शक्यता आहे. पुढे, जर तुम्ही या बनावट ईमेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केले तर, ते तुमच्या डिव्हाइसच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरेल.

e-Pan Card

होय, यामुळे तुमच्या मोबाईलमधील डेटाशी तडजोड होऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की, e-PAN कार्ड डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला भारत सरकारच्या अधिकृत आयकर वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर यूजर्सला तेथे e-PAN कार्ड डाउनलोडचा पर्याय मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo