लोकप्रिय बॅटल रॉयल गेम बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया BGMI पुन्हा एकदा भारतात परत येऊ शकतो. बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया डेव्हलपर क्राफ्टनने आपल्या वेबसाइटद्वारे सूचित केले आहे की, भारतीय वापरकर्ते पुन्हा एकदा हा गेम खेळू शकतात. या वर्षी ऑगस्टमध्ये भारत सरकारने BGMI वर बंदी घातली होती. खरं तर, हा गेम 2021 मध्ये लोकप्रिय गेम PUBG मध्ये काही बदलांसह भारतात पुन्हा लाँच करण्यात आला.
हे सुद्धा वाचा : Realme C33 वर भन्नाट ऑफर सुरु ! फक्त रु. 549 मध्ये तुमचा होईल फोन, बघा खास ऑफर
क्राफ्टनने BGMI इंडिया वेबसाइटवर काही नवीन ट्यूटोरियल व्हिडिओ पोस्ट केले आहेत, ज्यात BGMI गेमशी संबंधित व्हिडिओ आहेत. कंपनीने अलीकडेच Krafton Player Support नावाचे YouTube चॅनल देखील तयार केले आहे. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाच्या पुनरागमनासंदर्भात या यूट्यूब चॅनेलवर काही व्हिडिओ देखील पोस्ट करण्यात आले आहेत. म्हणजेच क्राफ्टनच्या या व्हिडिओंवरून स्पष्टपणे अंदाज लावला जाऊ शकतो की, कंपनी लवकरच भारतात पुन्हा एकदा आपला गेम सादर करणार आहे.
भारत सरकारने 2020 मध्ये Crafton च्या PUBG गेमवर भारतात बंदी घातली होती. यानंतर कंपनीने हा गेम एका वर्षानंतर 2021 मध्ये नवीन अवतार आणि नवीन नाव BGMI म्हणजेच Battlegrounds Mobile India सह सादर केला. मात्र, पुन्हा ऑगस्ट 2022 मध्ये क्राफ्टनच्या गेमवर भारतात बंदी घालण्यात आली.
या बंदीनंतर कंपनीने सरकारशी बोलत असल्याचे सांगितले होते आणि गेमर्सना लवकरच हा गेम पुन्हा खेळता येईल, असा विश्वास व्यक्त केला होता. आता हा गेम भारतात परत आणण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. या कमिंग सून टीझर व्हिडिओंवरून, BGMI लवकरच भारतात परत येऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.