आपल्या स्मार्टवॉचच्या रेंज वाढवत फायर बोल्टने भारतात एक नवीन स्मार्टवॉच 'फायर बोल्ट टॉक 2' लाँच केले आहे. ब्लूटूथ कॉलिंग आणि SpO2 मॉनिटरने सुसज्ज असलेल्या या स्मार्टवॉचची किंमत 2,499 रुपये आहे. ही वॉच ब्लॅक, ब्लु, व्हाईट, ग्रीन आणि रोज गोल्ड यासह विविध रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या वॉचमध्ये, तुम्हाला 60 स्पोर्ट्स मोडसह आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक मोड्स मिळतील. चला तर मग जाणून घेऊयात, या स्मार्टवॉचचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स…
कंपनी या वॉचमध्ये 240×240 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.28-इंच लांबीचा गोलाकार डिस्प्ले देत आहे. डिस्प्लेच्या बाजूला दोन क्राउन बटन्स आहेत. जे वॉचच्या मेनूमध्ये नेव्हिगेट करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. त्याबरोबरच, वापरकर्ते बटणसह व्हॉईस असिस्टंट फीचर देखील ऍक्टिव्ह करू शकतात. मेटल केसिंगमध्ये येत असलेली ही वॉच दिसायला खूपच प्रीमियम आहे.
फायर बोल्ट टॉक 2 मध्ये ब्लूटूथ कॉलिंग फीचर देखील देण्यात आले आहे. वॉचमध्ये कॉलिंगसाठी बिल्ट-इन माइक आणि स्पीकर देखील आहेत. स्मार्टफोनसोबत वॉच पेयर केल्यानंतर, तुम्हाला वॉचद्वारे कॉल कनेक्ट आणि रिसिव्ह करता येतील. वापरकर्त्यांच्या सोयीसाठी, यामध्ये क्विक डायल पॅड व्यतिरिक्त, रीसेंट कॉल आणि कॉन्टॅक्ट ऑप्शन्सदेखील दिले गेले आहेत.
ही स्मार्टवॉच IP68 डस्ट आणि वॉटर प्रूफ रेटिंगसह येते. त्याबरोबरच, ही वॉच आरोग्य आणि फिटनेसचे निरीक्षण करण्यासाठी अनेक फीचर्ससह येते. कंपनी या घड्याळात SpO2 मॉनिटरसोबत हार्ट रेट मॉनिटर आणि स्लीप ट्रॅकिंग सेन्सर देखील देत आहे. याशिवाय, तुम्हाला यात 60-स्पोर्ट्स मोड देखील मिळतील. वॉचमध्ये दिलेल्या व्हॉईस असिस्टंटसह, तुम्ही म्युझिक प्ले करू शकता, तसेच कॉल देखील करू शकता. मात्र, कंपनीने स्मार्टवॉचच्या बॅटरी आणि चार्जिंगबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.