तुम्हाला OTT प्लॅटफॉर्मवर Netflix वर सर्वोत्कृष्ट चित्रपट बघायची इच्छा होत आहे. परंतु बघायचं काय? याबद्दल गोंधळ होतोय? तर आज आम्ही तुम्हाला Netflix वर उपलब्ध असलेल्या टॉप हिंदी चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. या यादीत आम्ही तुम्हाला दमदार कंटेंटसह येणाऱ्या चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. हलक्याफुलक्या कॉमेडी आणि सस्पेन्स-थ्रिलर प्रकारच्या चित्रपटांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. बघुयात यादी-
चोर निकल के भागा हा नेटफ्लिक्स इंडियाचा ओरिजनल हिंदी चित्रपट आहे. हा एक हिंदी क्राइम थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये एअरहोस्टेस आणि तिच्या व्यवसायिक भागीदाराची कहाणी दाखवली गेली आहे. या वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. चित्रपटात यामी गौतम मुख्य भूमिकेत आहे.
संजय लीला भन्साळी यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी' 2022 साली मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. चित्रपट आता Netflix वर पाहता येईल. वेश्याव्यवसायात गुंतलेल्या गंगूबाई काठियावाडी नावाच्या महिलेवर आधारित चित्रपटात आलिया भटच्या दमदार अभिनयाने थिएटर चांगलेच गाजवले होते.
वध हा बॉलीवूडमधील क्राइम थ्रिलर ड्रामापैकी एक आहे. आपल्या मुलाला अमेरिकेत पाठवण्यासाठी कर्ज घेणाऱ्या माणसाची ही कथा आहे. यानंतर त्याच्या आयुष्यात अडचणी सुरू होतात. या चित्रपटात संजय मिश्रा, नीना गुप्ता, मानव वीज मुख्य भूमिकेत आहेत.
आर्टिकल 15 हा अनुभव सिन्हा यांनी सह-लिखित आणि दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. हे क्राईम ड्रामा सत्य घटनांवर आधारित आहे. आपल्या समाजात जात आणि भ्रष्टाचार किती मोठी भूमिका बजावत आहे, हे यातून दिसून येते. चित्रपटात आयुष्मान खुरानाने मुख्य भूमिका निभावली.