आसूस झेनपॅड Z8 टॅबलेट: अॅनड्रॉईनड 6.0 मार्शमॅलोवर आधारित

आसूस झेनपॅड Z8 टॅबलेट: अॅनड्रॉईनड 6.0 मार्शमॅलोवर आधारित
HIGHLIGHTS

हा 1.4Ghz हेक्सा-कोर स्नॅपड्रॅगन 650 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात एड्रेनो 510 GPU आणि 2GB ची रॅम दिली आहे. हा टॅबलेट अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे.

आसूसने बाजारात आपला नवीन टॅबलेट झेनपॅड Z8 लाँच केला आहे. हा एक 4G LTE टॅबलेट आहे आणि सध्यातरी ह्याला अमेरिकेत लाँच केले गेले आहे. ह्याची किंमत 249.99 डॉलर आहे आणि हा 23 जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.
 

ह्या टॅबलेटमध्ये 7.9 इंचाची QXGA IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ह्याचे रिझोल्युशन 2048×1536 पिक्सेल आहे. हा 1.4GHz हेक्सा-कोर स्नॅपड्रॅगन 650 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात एड्रेनो 510 GPU आणि 2GB ची रॅम दिली आहे. हा टॅबलेट अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. ह्यात 4680mAh ची बॅटरी दिली आहे.

हेदेखील वाचा – क्षणार्धात डेटा ट्रान्सफर करणारे हे आहेत काही महत्त्वपुर्ण आणि लोकप्रिय अॅप्स…

त्याशिवाय ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो. ह्यात 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात वायफाय, 4G LTE, ब्लूटुथ 4.1, GPS आणि USB टाइप-C पोर्टसारखे फिचर्स दिले आहेत. हा टॅबलेट दोन फ्रंट फेसिंग स्टिरियो स्पीकर्ससह येतो. ह्याचे वजन ३२० ग्रॅम आहे.

 

हेदेखील वाचा – हे आहेत वनप्लस 3 चे प्रतिस्पर्धी: पाहा ह्यांच्या स्पेक्स आणि बेंचमार्कची तुलना
हेदेखील वाचा – 
हार्ले डेविडसन बनवत आहे एक इलेक्ट्रिक बाइक!

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo