आसूस झेनपॅड 8, झेनपॅड 10 टॅबलेट लाँच, अॅनड्रॉईड मार्शमॅलोने सुसज्ज

आसूस झेनपॅड 8, झेनपॅड 10 टॅबलेट लाँच, अॅनड्रॉईड मार्शमॅलोने सुसज्ज
HIGHLIGHTS

दोन्ही टॅबलेट्स मिडियाटेक MT8163 64-बिट क्वाड-कोर प्रोसेसरसह माली - T720 GPU ने सुसज्ज आहे. दोन्ही टॅबलेट्समध्ये 5 मेगापिक्सेलचा ऑटोफोकस रियर कॅमेरा दिला गेला आहे.

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी आसूसने बाजारात आपले दोन नवीन टॅबलेट्स झेनपॅड 8 (Z380M) आणि झेनपॅड 10 (Z300M) लाँच केले आहे. ह्या दोन्ही टॅबलेट्सचे फीचर्स ओल्ड जनरेशन झेनपॅड्स सारखे आहेत. तथापि ह्या नवीन टॅबलेट्समध्ये वेगवेगळ्या प्रोसेसरचा वापर केला गेला आहे.तथापि, दोन्ही नवीन टॅबलेट्स नवीन अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात.
 

आसूस झेनपॅड 8 मध्ये ८ इंचाची WXGA डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1280×800 पिक्सेल आहे. हा डिस्प्ले आसूस ट्रू 2 लाइफ टेक्नॉलॉजीसह येतो. ह्यावर कॉर्निंग गोरिल्ला ग्लाससुद्धा दिला गेला आहे. तर आसूस झेनपॅड 10 टॅबलेटमध्ये 10 इंचाची डिस्प्ले दिली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1280×800 पिक्सेल आहे. दोन्ही टॅबलेट्स मिडियाटेक MT8163 64- बिट क्वाड-कोर प्रोसेसरसह माली – T720 GPU ने सुसज्ज आहे. दोन्ही टॅबलेट्समध्ये 5 मेगापिक्सेलचा ऑटोफोकस रियर कॅमेरा दिला गेला आहे. हे दोन्ही २ मेगापिक्सेलच्या फ्रंट फेसिंग कॅमे-यासह येतात.

हेदेखील वाचा – [ Marathi] HP elitebook Folio First Look – HP ईलाइटबुक फॉलिओ

आसूस झेनफोन 8 टॅबलेटला दोन व्हर्जनमध्ये लाँच केले गेले आहे. 1GB/2GB रॅम आणि 8GB/16GB अंतर्गत स्टोरेज. तर झेनपॅड 10 2GB रॅम आणि 16GB/32GB अंतर्गत स्टोरेज पर्यायासह लाँच केले गेले आहे. टॅबलेट्सची स्टोरेज मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो. दोन्ही डिवायसेसमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय, ब्लूटुथ, GPS आणि मायक्रो-USB पोर्ट (OTG सह) सारखे फीचर्स दिले गेले आहे. हे डिवायसेस अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोवर आधारित झेन UI वर चालतात.

झेनपॅड 8 मध्ये 15.2Wh (जवळपास 4000mAh) ची बॅटरी दिली आहे. तर झेनपॅड 10 मध्ये 18Wh (जवळपास 4750mAh) बॅटरी दिली गेली आहे. आसूस झेनपॅड 8 ची किंमत जवळपास 178 डॉलर असू शकते. तर झेनपॅड 10 ची किंमत २२३ डॉलर असेल. तथापि, कंपनीकडून ह्यांच्या किंमतीविषयी अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

हेदेखील वाचा – फ्लिपकार्टवर मिळत आहे स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स आणि इतर गॅजेट्सवर भारी सूट
हेदेखील वाचा – ट्विटर लवकरच लाँच करणार नाइट मोड फीचर

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo