आसूस झेनपॅड 3S 10 लाँच : १ ऑगस्टपासून होणार विक्रीसाठी उपलब्ध

Updated on 14-Jul-2016
HIGHLIGHTS

तायवानमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात आसूस झेनपॅड 3S 10 लाँच केला. ह्याची किंमत TWD 11,000 म्हणजेच ३४२ डॉलर इतकी आहे.

आसूसने सांगितल्याप्रमाणे एक नवीन टॅबलेट लाँच केला आहे. हा एक हाय-एंड टॅबलेट आहे. तायवानमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात आसूस झेनपॅड 3S 10 लाँच केला. ह्याची किंमत TWD 11,000 म्हणजेच ३४२ डॉलर इतकी आहे.

 

ह्या टॅबलेटमध्ये 9.7 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे सरासरी गुणोत्तर 4:3 आहे आणि त्याचे पिक्सेल रिझोल्युशन 2048×1538 पिक्सेल आहे.

हेदेखील पाहा – [Marathi] Le Eco Le 1S Overview – Le इको ली 1S ओव्हरव्ह्यू

हा मिडियाटेक MT8176 प्रोसेसरने सुसज्ज आहे, जो हेक्सा कोर CPU सह येतो. ह्यात दोन कोर्टेक्स A-72 कोर्स ज्याची गती 2GHz इतकी आहे आणि चार कोर्टेक्स A-53 कोर ज्याची गती 1.6GHz इतकी आहे.

हेदेखील वाचा – भारतीय बाजारात सर्वाधिक विकले गेलेले हे नोकियाचे जबरदस्त फोन्स…

ह्यात 4GB रॅमसह 32GB चे एक्सपांडेबल स्टोरेज दिले आहे. ह्यात 8MP चा रियर आणि 5MP चा सेल्फी कॅमेरा मिळत आहे. ह्यात 5900mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. हा अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोवर चालतो.

हेदेखील वाचा – मेटल बॉडीने सुसज्ज असेल मिजू MX6 स्मार्टफोन
हेेदेखील वाचा – 
एसर ट्रॅवलमेट X349 लॅपटॉप लाँच, 8GB रॅमने सुसज्ज

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :