जेनबो रोबोट आसूसद्वारा लाँच केला गेलेला हा स्मार्ट होम असिस्टंट आहे ज्याची किंमत $599 आहे.
आसूसने कॉम्प्युटेक्स 2016 च्या दरम्यान झेनफोन 3 आणि झेनबुक 3 सह आपला एक नवीन रोबोट जेनबो लाँच केला आहे. जेनबो एक स्मार्ट होम असिस्टेट आहे.
हा रोबोट घरात अगदी सहजपणे फिरु शकतो आणि तुमच्या दैनंदिन कामात तुमची मदत करु शकतो. ह्या रोबोटमध्ये एक कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने हा तुमचा चेहरा ओळखतो. हा व्हिडियो कॉल्ससुद्धा करतो. ज्याच्या माध्यमातूून रिमोट होम मॉनिटरिंगसुद्धा करु शकतो. हा फोटोसुद्धा काढतो. हा कमांड्स ऐकतो. हा एक रोबोटिक आवाजासह येतो. ज्याच्या माध्यमातून हा आपल्याला प्रतिसाद करतो. ह्यात बिल्ट इन स्टीरियो स्पीकरसुद्धा आहेत.
हा रोबोट लहान मुलांसोबत गेम्ससुद्धा खेळू शकतो. हा गोष्टी ऐकू किंवा वाचू शकतो. वेबवर सर्च करु शकतो. हा स्वयंपाकात तुम्हाला मदत करु शकतो. तो सुद्धा केवळ व्हॉईस कमांडच्या माध्यमातून.
जेनबो आपल्या घरामध्ये स्मार्ट डिवायसेसशी कनेक्टसुद्धा होऊ शकतो आणि त्यांच्यासोबत बातचीत करु शकतो. जेनबोमध्ये चेह-याच्या जागेवर एक डिस्प्ले दिली गेली आहे, जी एक्सप्रेस आणि इमोशन दाखवते.
जेनबोची किंमत डॉलर 599 आहे. मात्र हा डिवाइस बाजारात कधीपर्यंत आणला जाईल, ह्याविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही.