ह्या टॅबलेटमध्ये ५ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. त्याचबरोबर VGA फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. ह्या टॅबलेटसह आसूस वेबस्टोरेजच्या माध्यमातून 5GB क्लाउड स्टोरेजची सुविधा लाइफटाईमसाठी मोफत दिली आहे.
मोबाईल निर्माता कंपनी आसूसने आपला नवीन टॅबलेट बाजारात सादर केला आहे. ह्या टॅबलेटला एक्सक्लूसिव्हली ऑनलाइन शॉपिंग साइट स्नॅपडीलवर उपलब्ध केले आहे. स्नॅपडीलवर ह्या टॅबलेटची किंमत ७,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा टॅबलेट विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
जर आसूस झेनपॅड C 7.0 टॅबलेटच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 7 इंचाची IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1024×600 पिक्सेल आहे. ह्या डिवाइसमध्ये ACG ग्लाससह 20NM अँटी फिंगर कोटिंग आहे. त्याचबरोबर हा टॅबलेट मिडियाटेक MT8382 क्वाडकोर ARM कोर्टेक्स-A7 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात 2GB ची रॅम दिली गेली आहे. त्याचबरोबर ह्यात 3D ग्राफिक्स सपोर्टसुद्धा दिला गेला आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो.
ह्या टॅबलेटमध्ये ५ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. त्याचबरोबर VGA फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. ह्या टॅबलेटसह आसूस वेबस्टोरेजच्या माध्यमातून 5GB क्लाउड स्टोरेजची सुविधा लाइफटाईमसाठी मोफत दिली आहे.
हा टॅबलेट अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर आधारित आसूस झेनपॅड C 7.0 मध्ये 3450mAh ची बॅटरी दिली गेली आहे, जी कंपनीनुसार साडे आठ तास बॅटरी लाइफ देण्यास सक्षम आहे.