बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानने आपला मुलगा आर्यन खानला बॉलिवूडमध्ये लाँच करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. आर्यन खाननेही बहिण सुहाना खानप्रमाणे इंडस्ट्रीत सक्रिय होण्याची तयारी केली आहे. पण आर्यनचा हा डेब्यू पडद्यावर नसून कॅमेऱ्याच्या मागे असणार आहे. आर्यनला अभिनयापूर्वी निर्मिती क्षेत्रात हात आजमावायचा आहे. आर्यनच्या आगामी प्रोजेक्टसाठी शाहरुखने त्याच्या प्रशिक्षणासाठी एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याला सोबत घेतल्याचे समोर आले आहे.
हे सुद्धा वाचा : AMAZON सेलमध्ये SAMSUNG GALAXY S22 10,000 रुपयांनी स्वस्तात खरेदी करा, ऑफर्स पहा
पदार्पण करण्यापूर्वी आर्यनने यूएसमधून फिल्म मेकिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. शाहरुख खानने एकदा मुलाखतीत सांगितले होते की, आर्यन खानला त्याच्यासारखा अभिनय करायला आवडत नाही. त्यांना चित्रपट सृष्टीत रस आहे.
एका रिपोर्टनुसार, लवकरच शाहरुखचा मुलगा आर्यन त्याच्या डेब्यू प्रोजेक्टचे प्रोडक्शन हाती घेणार असून त्यावर काम सुरू झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, आर्यन लवकरच शाहरुखची प्रोडक्शन कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनवल्या जाणाऱ्या वेबसीरिजची स्क्रिप्ट लिहणार आहे. आर्यनला दिग्दर्शन करण्यापूर्वी लेखक म्हणून स्वत:ला आजमावायचे आहे. यासाठी शाहरुखने त्याला उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध इस्रायली सिरीज 'फौदा'चे फिल्ममेकर 'लिओर राज' यांची निवड केली आहे. आर्यनला चित्रपट अभिनयापेक्षा चित्रपट निर्मितीमध्ये जास्त रस आहे.
आर्यन खानच्या या डेब्यू प्रोजेक्टवर काम सुरू झाले आहे. या वेबसीरिजच्या कलाकारांच्या ऑडिशन्सही सुरू झाले आहेत. सध्या या वेबसिरीजचे काम सुरुवातीच्या टप्प्यात आहे, पण या वर्षाच्या अखेरीस त्याचे शूटिंग सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. बिलाल सिद्दीकीसोबत काम करणार असल्याच्या या वेबसीरिजच्या स्क्रिप्टिंगबद्दलही आधी वृत्त आले होते. बिलाल 'बार्ड ऑफ ब्लड' या प्रसिद्ध सिरीजचा सहलेखक आहे.
या व्यतिरिक्त, शाहरुखच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच त्याच्या पठाण या मोठ्या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. या चित्रपटात सलमान खान कॅमिओ करणार असल्याचीही चर्चा आहे. हा चित्रपट जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.