Vodafone Idea, Airtel यूजर्स साठी वाईट बातमी

Vodafone Idea, Airtel यूजर्स साठी वाईट बातमी
HIGHLIGHTS

जर तुम्ही पण वोडाफोन आईडिया आणि एयरटेलचे सब्सक्राइबर असाल तर हि बातमी तुमच्यासाठीच आहे. कदाचित या दोन्ही कंपन्या एक असा निर्णय घेऊ शकतात जो यांच्या सब्सक्राइबर्सना निराश करू शकतो. या दोन्ही कंपन्या काही यूजर्सचे कनेक्शन बंद करू शकते.

नुकत्याच आलेल्या एका रिपोर्ट नुसार असे Vodafone-Idea आणि Airtel सिम सब्सक्राइबर्स जे प्रत्येक महिन्याला 35 रुपयांपेक्षा कमीच रिचार्ज करतात, त्यांचे कनेक्शंस बंद केले जाऊ शकतात. हो, असे होऊ शकते. असे बोलले जात आहे कि असे करणारे जवळपास 200 मिलियन सब्सक्राइबर्स आहेत ज्यांचे कनेक्शन बंद केले जाऊ शकते. तुम्हाला सांगू इच्छितो कि Vodafone-Idea आणि Bharti Airtel ने Low Average Realisation Per User (ARPU) असलेल्या यूजर्सचे कनेक्शन बंद कारण्याचा निर्णय घेतला आहे.

यामागील कारण म्हणजे अशा प्रकारचे सर्व यूजर्स 35 रुपयांपेक्षा कमीचा रिचार्ज करून 10 रुपयांचा ARPU जेनरेट करत आहेत ज्यामुळे एयरटेलला जवळपास 100 कोटी रुपयांचा महिन्याचा रेवेन्यू मिळतो. अशा यूजर्सनि जर महिन्याला 35 रुपयांपर्यंतचा रिचार्ज केला तर कंपनी महिन्याला 175  कोटी रुपयांचा रेवन्यू मिळवू शकते. त्यामुळे 250 मिलियन 2G कनेक्शंस डिसकनेक्ट केले जाऊ शकतात, जर यूजर्सनी रिचार्ज वाढवला नाही तर. एयरटेल नुसार त्यांच्याकडे 100 मिलियन असे यूजर्स आहेत तर वोडाफोन आइडिया कडे असे जवळपास 150 मिलियन यूजर्स आहेत. बातमी नुसार या कंपन्यांनी आपले 35 रुपये किंवा त्यापेक्षा कमी किंमतीचे मासिक रिचार्ज प्लान्स काढून टाकले आहेत जे ARPU च्या खाली होते.

Bharti Airtel चे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर Gopal Vittal म्हणाले, "आमच्यकडे 330 मिलियन वायरलेस कस्टमर्स आहेत पण तुम्ही कंझम्पशन पॅटर्न बघितला तर तुम्हाला दिसेल कि लो लेवल Arpu सह असणारे असे भरपूर कस्टमर्स आहेत ज्यांना आम्ही टेलीनॉर कडून घेतले आहे आणि काही आमचे आहेत, जवळपास 100 मिलियन."

जर काही कस्टमर Airtel किंवा Vodafone Idea सिम सेकेंडरी मोबाईल कनेक्शन म्हणून वापरत असतील तर असे होऊ शकते कि ते सर्व प्रत्येक महिन्याला 35 रुपयांपेक्षा कमीचा रिचार्ज करत असतील. अशाप्रकरचे सेकंड कनेक्शन बऱ्याचदा फक्त इनकमिंग कॉल्स साठी वापरले जाते आणि 10 रुपयांच्या रिचार्जने वॅलिडिटी कायम ठेवली जाते. त्यामुळे कंपनीचा हा निर्णय त्यांचा नेटवर्क यूजर्स द्वारा प्राइमरी सिम ऑपरेटर म्हणून वापरण्यावर भर देण्यासाठी आहे किंवा मग यूजर्स आपल्या रिचार्ज प्लान्स मध्ये पण या निर्णयामुळे बदल करू लागतील.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo