तंत्रज्ञानाची कमतरता असल्यामुळे, अनेक स्त्रियांना व्यावसायिक क्षेत्रात कधी कधी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, पण तेच जर भारतीय महिलांनी तंत्रज्ञानालाही तितकेच महत्त्व दिले तर, पुरुषप्रधान देशात पुरुषाच्या बरोबरीने त्याही तंत्रज्ञान जगतात पाऊल ठेवू शकतात, एवढच नव्हे तर, व्यावसायिक क्षेत्रात पुरुषांवर मात करुन उच्चस्थानी पोहचू शकतात. आपल्या देशात एखादी महिला तंत्रज्ञ आणि उद्योजक का नाहीय? चला तर मग पाहूया ह्याची नेमकी कारणे काय आहेत ती?
महिलांचे तंत्रज्ञान क्षेत्रातील सहभाग वाढवणे हे म्हणावे तितके सोपे नाही. मी अनेकदा टेक क्षेत्रात असलेल्या महिलांची आकडेवारी काढण्याचा प्रयत्न केला पण तो म्हणावा तितका उल्लेखनीय नव्हता. त्यातील ज्या मुली इंजिनीयरिंग आणि टेक क्षेत्र जॉइन करतात, त्यातील ठराविकच रेकॉर्डवर वेगवेगळ्या भूमिकेतून बाहेर पडतात. हे चित्र अमेरिकेमध्ये तरी पाहायला मिळते. त्यामुळे ह्या गोष्टीला काही अर्थ नाही. जास्त मागणी, जास्त पगार असूनसुद्धा महिला अशी नोकरी का सोडून जातात?
ह्यासाठी आम्ही केलेल्या सर्वेनुसार, आम्हाला दोन वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम पाहायला मिळाले, जे खरच थोडे धक्का देणारे होते. त्याचा असा निष्कर्ष आमच्यासमोर आला की, ७१६ महिलांनी साधारण ७ वर्षानंतर टेक संबंधित असलेला व्यवसाय सोडून दिला ज्याचे प्रमुख कारण होते, कामाच्या ठिकाणी केला जाणारा भेदभाव, वातावरण, वर्तणूक. तर दुस-या सर्वेमध्ये असे दिसून आले की, ५३०० महिला ज्यांनी इंजिनीयरिंगची पदवी घेतली, त्यातील ३८% महिला जास्त काळ इंजिनीयर्स म्हणून काम करु शकल्या नाही, ज्याचे कारणही टेक कंपन्यांमधील संस्कृती, वातावरण असेच होते.
जर मुलींना एखाद्या तंत्रज्ञानाच्या कामाच्या ठिकाणी अॅडजस्ट करुन घेतले नाही, तर त्या मुलींनी अथवा महिलांनी उद्योजक म्हणून काम करावे किंवा स्वत: ची कंपनी चालू करावी.
स्त्री-पुरुष समानता, एकात्मता, समता ह्यावर आपण अनेकदा चर्चा होतात, वाद-विवाद होतात, पण त्याच्या योग्य निष्कर्षावर आपण अजूनपर्यंत पोहोचलेलोच नाही. त्यामुळे आता गरज आहे ती, जास्तीत जास्त महिलांनी स्वत: पुढाकार घेऊन टेक जगतात प्रवेश करण्याची.
हेदेखील वाचा – महिलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे 5 अॅप्स