घरबसल्या Passportसाठी Online अप्लाय करा, अवघ्या तीन दिवसांत होईल काम

घरबसल्या Passportसाठी Online अप्लाय करा, अवघ्या तीन दिवसांत होईल काम
HIGHLIGHTS

तात्काळ स्कीमअंतर्गत पासपोर्टसाठी अप्लाय करा.

अवघ्या तीन दिवसांत तुमच्या हातात पासपोर्ट असेल.

घरबसल्या ऑनलाईन काम करा आणि तुमच्या वेळेची बचत करा.

Passport बनवणे आता काही अवघड काम राहिले नाही. तुम्ही पासपोर्ट बनवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आता जास्त विचार करण्याची गरज नाही. यासाठी आम्ही तुम्हाला सोप्या मार्ग सांगणार आहोत. आता तुम्ही घरबसल्या पासपोर्टसाठी अप्लाय करू शकता. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात अगदी सोपी प्रक्रिया- 

Passportसाठी Online अप्लाय करा

पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृतसाईट वर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला 'Passport type' वर क्लिक करावे लागेल. तुम्हाला यासाठी काही विशेष आणि वेगळे करण्याची गरज नाही. फक्त सर्वसामान्य माहिती प्रविष्ट करा. तुम्ही जर तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज केला आहे, तर तुम्हाला तो लगेच डिलिव्हर केला जाईल. विना पोलीस वेरिफिकेशन्स रिपोर्टने सध्या पासपोर्ट बनवून दिला जातो. 

अवघ्या तीन दिवसांत तुमच्या हातात 

पासपोर्ट बनवते वेळी सर्व आवश्यक माहिती जर अचूक असेल, तर पासपोर्ट अवघ्या तीन दिवसांत तुमच्या हातात येणार आहे. तात्काळ स्कीमअंतर्गत पासपोर्टसाठी अप्लाय करण्याची प्रक्रिया आता सोपी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. मात्र, तात्काळ पासपोर्टसाठी प्रत्येक व्यक्ती अप्लाय करू शकत नाही. क्वचित देशातील लोक उदा. नागालँडमधील रहिवासी यासाठी अप्लाय करू शकत नाही. सध्या तुम्ही तात्काळ पासपोर्टचा वापर कुठेही करू शकता. 

किती येणार खर्च ? 

आम्ही तुम्हाला सांगतो की, तात्काळ पासपोर्ट बनवण्यासाठी 36 पेजच्या बुकलेटसाठी 3,500 रुपयांचा खर्च येतो. तर, 60 पेजच्या बुकलेटसाठी एकूण 4 हजार रुपयांचा खर्च येतो. या प्रक्रियेने पासपोर्ट बनवण्याचा अवधी खूप कमी होऊन जातो. यामुळे, नागरिकांच्या वेळेची खूप बचत होते. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo