Apple WWDC 2023 मेगा इव्हेंट आज, जाणून घ्या कुठे बघता येईल लाईव्ह स्ट्रिमिंग

Updated on 05-Jun-2023

Apple चा WWDC 2023 म्हणजेच वर्ल्डवाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्स आज होणार आहे. संपूर्ण टेक विश्वात आजच्या कार्यक्रमाची चर्चा आहे. या इव्हेंटमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेले iOS 17 सॉफ्टवेअर लाँच केले जाणार, अशी माहिती मिळाली आहे. इव्हेंटमध्ये मिक्स्ड रियालिटी VR हेडसेट आणि MacBook चे अपग्रेडेड व्हर्जन देखील सादर केले जाऊ शकते. 

कधी आणि कुठे बघता येईल लाईव्ह

Apple चा WWDC 2023 इव्हेंट आजपासून म्हणजेच 5 जूनपासून सुरू होईल आणि शुक्रवार, 9 जूनपर्यंत चालणार आहे. हा इव्हेंट रात्री 10:30 वाजता सुरू होईल आणि कंपनीच्या अधिकृत YouTube चॅनेलवर लाईव्ह बघता येणार आहे. 

या व्यतिरिक्त, वापरकर्ते अधिकृत वेबसाइटवर तसेच iPhone, iPad आणि MacBook वर Apple TV च्या Watch Now सेक्शनमध्ये जाऊन हा इव्हेंट बघू शकतात. 

iOS 17 बद्दल थोडक्यात

कंपनी या सॉफ्टवेअरमध्ये अनेक मोठे बदल करणार आहे. यामध्ये, नवीन कंट्रोल सेंटरसह, ॲक्टिव्ह विजेट्स आणि नवीन एनीमेशन्स इ. पाहता येतील. यासह iPhone चा इंटरफेस पूर्णपणे बदलणार आहे. वृत्तानुसार, सॉफ्टवेअर अपडेट iPhone 14, iPhone 13, iPhone 12 आणि iPhone 11 सिरीजसाठी उपलब्ध केले जाईल. 

iPhone 15

आम्ही तुम्हाला सांगतो की, या इव्हेंटमध्ये iPhone 15 सीरीज लाँच होणार नाही. ही आगामी लाइनअप यावर्षी सप्टेंबरमध्ये सादर केली जाईल. या सीरीज अंतर्गत iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max लाँच केले जातील, अशी माहिती मिळाली आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :