दोन महिन्यांसाठी फ्री मिळतेय Apple TV+ चे सबस्क्रिप्शन, ‘अशा’प्रकारे क्लेम करा

Updated on 25-Apr-2023
HIGHLIGHTS

Apple TV+ ही अमेरिकन सबस्क्रिप्शन स्ट्रीमिंग सेवा

या सबस्क्रिप्शन सेवेची किंमत भारतात दरमहा 99 रुपये

सध्या कंपनी संपूर्ण 2 महिन्यांसाठी फ्री ट्रायल ऑफर करत आहे.

Apple TV+ ही अमेरिकन सबस्क्रिप्शन स्ट्रीमिंग सेवा भारतात खूप लोकप्रिय आहे. या सबस्क्रिप्शन सेवेची किंमत भारतात दरमहा 99 रुपये आहे. कंपनी वापरकर्त्यांना 7 दिवसांची फ्री ट्रायल देखील देते. पण, सध्या कंपनी संपूर्ण 2 महिन्यांसाठी ही सेवा यूजर्सना मोफत देत आहे. या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर जगभरातील अनेक उत्कृष्ट चित्रपट आणि शो पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

 Apple युजर्स असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. तुम्ही Apple TV Plus कंटेंट 2 महिने विनामूल्य ऍक्सेस करू शकता. 

सिरीजला प्रमोट करण्यासाठी ऑफर

कंपनी अनेकदा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर एखाद्या विशिष्ट शोला प्रमोट करण्यासाठी अशा ऑफर देते. ही ऑफर देखील कंपनीने एका नवीन सीरिजच्या प्रमोशनसाठीच आणली आहे. 'द लास्ट थिंग हि टोल्ड मी' नावाची जेनिफर गार्नर स्टारर मालिका Apple TV+ वर प्रवाहित होत आहे. या सिरीजला प्रमोट करण्यासाठी कंपनीने मर्यादित काळासाठी मोफत सबस्क्रिप्शन ऑफर आणली आहे.

दोन महिन्यांची मोफत चाचणी क्लेम कशी कराल ?

– सर्व आधी Apple TV+ च्या अधिकृत मायक्रोसाइटवर जा.

– आता तुम्हाला 'Accept Two Months Free' पर्याय दिसेल, मोफत सबस्क्रिप्शनसाठी त्यावर क्लिक करा.

– आता तुमच्या मोबाईल फोन किंवा लॅपटॉपवर Apple TV ऍप ओपन होईल.

– येथे तुम्हाला तुमचा Apple ID आणि पासवर्ड द्यावा लागेल.

– आता तुम्हाला मोफत सबस्क्रिप्शनची माहिती पॉप-अप मेसेजद्वारे येईल.

– याचा लाभ घेण्यासाठी 'कन्फर्म' पर्यायावर क्लिक करा. 

– यानंतर, तुम्ही Apple TV+ प्लॅटफॉर्मवर उपलब्ध शो आणि चित्रपटांचा आनंद घेऊ शकता.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :