मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. Appleचे स्टोअर मुंबईत पुढील महिन्यापर्यंत सुरू होईल आणि त्यानंतर देशाची राजधानी नवी दिल्लीतही Apple चे रिटेल स्टोअर सुरू होईल. सध्या Appleचे भारतात फक्त ऑनलाइन स्टोअर आहे. इतर स्टोअर्स Apple चे अधिकृत स्टोअर आहेत. असे म्हटले जात आहे की, Appleचे मुंबईतील स्टोअर रिलायन्स इंडस्ट्रीच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये असेल, अशी माहिती मिळाली आहे.
हे सुद्धा वाचा : iQOO Z7 5G ची पहिली सेल सुरु, 1,500 रुपयांच्या सवलतीसह नवीन फोन खरेदी करा
Apple भारतीय बाजारपेठेबाबत खूपच गंभीर झाले आहे. ऍपल उत्पादनांच्या उत्पादक कंपन्या भारतात सातत्याने त्यांचे प्लांट उभारत आहेत आणि लाखो डॉलर्सची गुंतवणूक करत आहेत. आता बातमी आहे की Apple चे पहिले फ्लॅगशिप स्टोअर मुंबईत उघडणार आहे. मात्र, Apple ने अधिकृतपणे त्यांच्या आगामी स्टोअरबद्दल काहीही सांगितले नाही. मुंबईचे स्टोअरही न्यूयॉर्क, बीजिंग आणि सिंगापूरसारख्या Apple च्या स्टोअरसारखे असेल.
Apple चे नवी दिल्लीतील स्टोअर 10,000-12,000 स्क्वेअर फूट मध्ये असेल. दिल्लीचे स्टोअर सिटीवॉक मॉल असेल आणि या स्टोअरचे लॉन्चिंग एप्रिल ते जून दरम्यान असेल. काही महिन्यांपूर्वी आलेल्या एका अहवालात असा दावा करण्यात आला होता की, Apple या दोन्ही स्टोअरसाठी हायरिंग करत आहे.