मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील पहिल्या मुंबईतील Apple स्टोअरच्या लाँचबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर, तो दिवस उजळला आहे, Apple ने भारतात पहिले Apple Store लाँच केले आहे. कंपनीचे CEO टिम कुक यांनी मुंबईत Apple BKC स्टोअरचे उद्घाटन केले. ओपनिंगचा व्हीडिओदेखील समोर आला आहे.
उद्घाटन करताना लाल रिबन कापली गेली नाही किंवा कात्रीही वापरावी लागली नाही. कुकने थेट Apple स्टोअरचा दरवाजा उघडला. Apple ने भारतात 25 वर्षांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर पहिले स्टोअर लाँच केले आहे. लाँच होण्याआधी स्टोअरवर बरीच गर्दी जमलेली बघायला मिळाली. मुंबईमध्ये APPLE चे स्टोअर BKC मध्ये सुरु झाले आहे. ओपनिंगचा व्हीडिओ तुम्ही खाली बघू शकता.
https://twitter.com/ANI/status/1648198464948551680?ref_src=twsrc%5Etfw
Apple स्टोअर सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत ग्राहकांच्या सेवेसाठी सुरू राहणार आहे. हे स्टोअर ग्राहकांसाठी 24/7 सुरु असणार आहे, असे सांगितले जात आहे. हे स्टोअर JIO वर्ल्ड ड्राइव्ह वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे. स्टोअरमध्ये काम करणारे कर्मचारी पूर्णपणे प्रशिक्षित आहेत.
या Apple स्टोअरमधील कर्मचारी वीसपेक्षा जास्त भाषा बोलू शकतात, अशी देखील माहिती मिळाली आहे. कर्मचारी ग्राहकांना सर्वोत्तम प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेसचा तपशील अगदी सहजरित्या समजावून सांगणार आहे. त्याबरोबरच, स्टोअरवर APPLE ट्रेंड इन प्रोग्रामची देखील सुविधा आहे.
दरम्यान, अवघ्या दोन दिवसांनी 20 एप्रिल रोजी दिल्लीतील साकेत भागात Appleचा भारतातील दुसरा स्टोअर ओपन करण्यात येणार आहे.