मुंबईकरांनो लक्ष द्या ! Apple ने शेअर केली शहरातील ग्रँड इंडिया रिटेल स्टोअरची पहिली झलक

Updated on 05-Apr-2023
HIGHLIGHTS

मुंबईतील JIO वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये भारतातील Apple पहिल्या ब्रिक-अँड-मोटार्स स्टोअरच्या बॅरिकेड्सचे अनावरण

सरकारच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमाला चालना देण्यासाठी योजना

भारतात कोविड दरम्यान कंपनीने भारतात चांगले काम केले.

Apple ने बुधवारी भारतातील आपल्या बहुप्रतीक्षित ब्रँडेड रिटेल स्टोरअरवरून पडदा काढला आहे, केंद्र सरकारच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमाला चालना देण्यासाठी स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची योजना आहे. Appleने मुंबईतील JIO वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये भारतातील त्यांच्या पहिल्या ब्रिक-अँड-मोटार्स स्टोअरच्या बॅरिकेड्सचे अनावरण केले.  

मुंबईतील वैशिष्ट्यपूर्ण 'काली-पिली' टॅक्सी कला

मुंबईतील वैशिष्ट्यपूर्ण 'काली-पिली' टॅक्सी कलेपासून प्रेरित होऊन, Apple BKC अनेक Apple प्रोडक्ट आणि सेवांच्या डिझाइन्सचा समावेश आहे, जो कंपनीच्या ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. 

स्टोअरच्या क्रिएटिव्हमध्ये Appleच्या क्लासिक ग्रीटिंग 'हॅलो मुंबई'सह जाणाऱ्या लोकांसाठी ब्राईट वेलकम देखील आहे.

या महिन्यात स्टोअर ओपन करण्यासाठी सज्ज

कंपनीने म्हटले की, "नवीन स्टोअर ओपनिंगचा आनंद साजरा करण्यासाठी व्हिजिटर्स नवीन Apple BKC वॉलपेपर डाउनलोड करू शकतात. तसेच, Apple Music वर खास क्युरेट केलेल्या प्लेलिस्टसह ग्रूव्ह करू शकतात." कंपनी विद्यमान महिन्यात हे स्टोअर ओपन करण्यासाठी सज्ज झाली आहे. तसेच, कंपनी लवकरच राजधानी दिल्लीमध्ये देखील एक रिटेल स्टोअर लाँच करणार आहे. 

काय म्हणाले Apple चे CEO ?

Apple चे CEO टीम कूक म्हणाले, "भारतातील व्यवसायामध्ये आम्ही तिमाही महसूल रेकॉर्ड आणि वर्ष दर वर्ष मजबूत दुहेरी अंकी वृद्धी केली आहे. त्यामुळे आमच्या उत्तम कामगिरीमुळे आम्हाला खूप चांगले वाटते.''

 ते पुढे म्हणाले की " खरं तर भारतात कोविड दरम्यान कंपनीने भारतात चांगले काम केले आहे. हेच कारण आहे की, आम्ही भारतात रिटेल, ऑनलाईन स्टोअर आणण्यासाठी आणि तेथे लक्षणीय ऊर्जा घालण्यासाठी गुंणवणक करत आहोत. आम्ही भारताबद्दल खूप आशावादी आहोत. " 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :