ई-सिम तंत्रज्ञान आपलेसे करण्याबाबत अॅप्पल आणि सॅमसंगची बातचीत सुरु

Updated on 01-Oct-2015
HIGHLIGHTS

ईलेक्ट्रॉनिक सिम(ई-सिम) तंत्रज्ञान घेण्यासाठी सेवा प्रदात्यांशी अॅप्पल आणि सॅमसंगची बातचीत सुरु आहे.

फायनानशिअल टाईम्सने दिलेल्या अहवालानुसार, अॅप्पल आणि सॅमसंगची  टेलिकॉंम सेवा प्रदात्यांशी इलेक्ट्रॉनिक सिम तंत्रज्ञान घेण्यासाठी चर्चा सुरु असल्याचे सांगण्यात येतय. AT&T, ऑरेंज आणि व्होडाफोनसारख्या नेटवर्क  प्रदात्यांसोबत प्रगतीशील अशी ही चर्चा चालू आहे, आणि जर हयातून काही साध्य झाले तर ग्राहक सदस्यता ते टेलिकॉम ऑपरेटर हा मार्ग पुर्णपणे बदलून जाईल. सध्याचे सार्वत्रिक दर्जाचे सिम म्हणजे प्लॅस्टिकचा तुकडा असलेले  फिजिकल सिम ज्याचा वापर एखादा प्रोग्राम विशिष्ट नेटवर्क प्रदात्यांसाठी लॉक केला जातो.

 

 

 

सध्याच्या फिजिकल सिममध्ये काही अंतर्गत बदल जे नेटवर्कमध्ये स्विच करु शकतात, असे बदल करणे आवश्यक आहे. जगभरातील नेटवर्क प्रदात्यांचे प्रातिनिधित्व करणारी GSMA ने अशी घोषणा केली आहे की, आम्ही या डिलच्या अगदी जवळ आहोत, जी मानक आणि अनेक फोन्सना सार्वत्रिक पद्धतीने जोडून ठेवेल आणि ह्या डिलचा अॅप्पल आणि सॅमसंगमध्ये समावेश करण्यात आलाय.  जरी त्याची सविस्तर माहिती अजून उघड झाली नसली तरी GSMA ने दावा केला आहे की, ई-सिम तंत्रज्ञान सामान्य वास्तुशास्त्रला ली़ड करेल. त्यामुळे अधिकाधिक फोन उत्पादक आणि नेटवर्क प्रदाते ह्यात सहभागी होऊन या तंत्रज्ञानाला  सपोर्ट करतील.

 

मात्र तरीही हे तंत्रज्ञान विकसित होण्यासाठी थोडा वेळ लागेल, त्यामुळे २०१६ पर्यंत तरी फोनसोबत  ई-सिम तंत्रज्ञान येण्याचे काही चिन्ह नाही. फायनानशिअल टाईम्समध्ये GSMA ने केलेल्या विधानात असे म्हटले आहे की, “बोर्डवरील बहुतांश ऑपरेटर्सबरोबर, हया सिमच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत झालेल्या सुधारणा आणि त्यात वापरण्यात आलेले तांत्रिक वास्तुशास्त्र ह्याचा नीट अभ्यास करुन हे ग्राहकांसाठी देण्यात येईल, त्यामुळे त्याचे वितरण २०१६ मध्ये केले जाईल”

 

तरीही अॅप्पल किंवा सॅमसंगने हयाबाबत कोणतेही अधिकृत विधान किंवा टिप्पणी केली नाही.

Souvik Das

The one that switches between BMWs and Harbour Line Second Class.

Connect On :