Price Cut! Apple Pad झाला स्वस्त, 5000 रुपयांच्या कपातीसह एकूण 9 हजार रुपयांचा लाभ, बघा Attractive ऑफर। Tech News 

Price Cut! Apple Pad झाला स्वस्त, 5000 रुपयांच्या कपातीसह एकूण 9 हजार रुपयांचा लाभ, बघा Attractive ऑफर। Tech News 
HIGHLIGHTS

कंपनीने या Apple Pad वर थेट 5000 रुपयांची घट केली आहे.

iPad सध्या 4000 रुपयांच्या झटपट कॅशबॅकवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

Apple Pad ऍपल स्टोअर तसेच Apple च्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येईल.

Apple ने आपल्या 10व्या पिढीच्या आयपॅडच्या किमतीत कपात केली आहे. होय, कंपनीने या लोकप्रिय डिवाइसवर  थेट 5000 रुपयांची घट केली आहे. हा आयपॅड गेल्या वर्षी 18 ऑक्टोबर रोजी लाँच करण्यात आला होता. जवळपास एका वर्षाने या उपकरणाच्या किमतीत आकर्षक कपात केली गेली आहे. बघुयात iPad ची किंमत आणि उपलब्ध सर्व ऑफर्स. 

हे सुद्धा वाचा: Amazon सेलमध्ये 16 इंच डिस्प्ले लॅपटॉपवर बंपर Discount, अशी संधी पुन्हा मिळणार नाही। Tech News

apple pad
apple pad

किंमत आणि ऑफर

नवीन iPad Wi-Fi मॉडेल मागील वर्षी 44,900 रुपयांना लॉन्च करण्यात आले होते, तर Wi-Fi Plus सेल्युलर मॉडेलची किंमत 59,900 रुपये होती. तर, आता त्याच 10व्या जनरेशनच्या iPad ची सुरुवातीची किंमत 39,900 रुपये आहे. याचा अर्थ थेट 5000 रुपयांची कपात झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, सणासुदीच्या काळात 10व्या पिढीचा iPad सध्या 4000 रुपयांच्या झटपट कॅशबॅकवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. 

लक्षात घ्या की, यासह 10व्या जनरेशनचा आयपॅड 35,900 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. Apple ने iPad Pro, 9व्या iPad Air च्या किंमतीत कपात केलेली नाही. Apple Pad ऍपल स्टोअर तसेच Apple च्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येईल. 

Apple Pad

मात्र, Apple ने iPad Pro, 9व्या iPad Air च्या किंमतीत कपात केलेली नाही. हे Apple स्टोअर तसेच ऍपल वेबसाइटवरून खरेदी केले जाऊ शकते. याशिवाय, Apple च्या पार्टनर स्टोअरमधून देखील Apple पॅड खरेदी करता येईल.

Apple iPad 10 व्या जनरेशनचे तपशील

iPad 10.9 इंच लिक्विड रेटिना डिस्प्लेसह येतो. यात A14 बायोनिक चिपसेट बसवण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये 12MP अल्ट्रा-वाइड फ्रंट कॅमेरा आहे. मागील मॉडेलमध्ये 7MP फ्रंट कॅमेरा होता. 10व्या पिढीचा iPad व्हिडिओ एडिटिंग, गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी उत्तम आहे. तसेच, यामध्ये दीर्घ बॅटरी आयुष्य, अधिक स्टोरेज पर्याय आणि USB-C पोर्ट उपलब्ध आहेत. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo