भारतीयांसाठी Appleचा मोठा निर्णय! देशात उघडणार पहिले रिटेल स्टोअर ?

Updated on 09-Jan-2023
HIGHLIGHTS

Apple लवकरच भारतात फ्लॅगशिप रिटेल स्टोअर उघडणार आहे.

भारतीय स्‍मार्टफोन मार्केट जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या स्‍मार्टफोन मार्केटपैकी एक आहे.

Apple स्टोअर्ससाठी टाटाच्या मालकीच्या इन्फिनिटी रिटेलशी बोलणी करत आहे.

टेक जायंट Apple भारतात आपले पहिले रिटेल स्टोअर उघडण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने रिटेल स्टोअर्ससाठी कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Appleच्या करिअर पेजमध्ये "भारतातील विविध ठिकाणी" विविध नोकऱ्यांच्या संधी सूचीबद्ध केल्या आहेत. टाटा समूह देशभरात जवळपास 100 लहान Apple स्टोअर्स उघडण्याच्या तयारीत आहे. आयफोन आणि आयपॅड सारखी लोकप्रिय Apple प्रोडक्ट्स या स्टोअरमध्ये विकली जातील. 

 हे सुद्धा वाचा : POCO X5 Pro लवकरच भारतात होणार लाँच, वाचा डिटेल्स…

रिपोर्टनुसार, Apple लवकरच भारतात फ्लॅगशिप रिटेल स्टोअर उघडणार आहे. मात्र, कंपनीने भारतात रिटेल स्टोअर्स उघडण्याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, ऍप्पल दीर्घ काळापासून भारतात फिजिकल रिटेल स्टोअर्स सुरू करण्याचा विचार करत आहे. भारतीय स्‍मार्टफोन मार्केट जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या स्‍मार्टफोन मार्केटपैकी एक आहे.

एका वृत्तानुसार, Apple भारतात आपले पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर उघडण्याच्या तयारीत आहे आणि रिटेल स्टोअरच्या कर्मचार्‍यांना कामावर घेण्यास सुरुवात केली आहे. अहवालानुसार, कंपनी बिझनेस एक्सपर्ट, ऑपरेशन्स एक्सपर्ट आणि टेक्निकल स्पेशलिस्ट सारख्या पदांसाठी भरती करत आहे.

टाटा समूह देशभरात 100 Apple स्टोअर्स उघडणार आहे.

टाटा समूह लवकरच देशभरात सुमारे 100 लहान Apple स्टोअर्स उघडण्याच्या तयारीत आहे.  एका वृत्तानुसार, ऍप्पल स्टोअर्ससाठी टाटाच्या मालकीच्या इन्फिनिटी रिटेलशी बोलणी करत आहे. इन्फिनिटी रिटेल भारतात क्रोमा स्टोअर चालवते. अहवालानुसार, हे स्टोअर्स मॉलमध्ये तसेच हाय-स्ट्रीट आणि शेजारच्या ठिकाणी उघडले जातील आणि ही स्टोअर्स Appleच्या प्रीमियम पुनर्विक्रेत्या स्टोअरपेक्षा लहान असतील. लहान स्टोअर्स iPhones, iPads आणि Apple घड्याळे विकतील.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :