Apple च्या मोठ्या वार्षिक कार्यक्रमाची प्रतीक्षा अखेर आज, 7 सप्टेंबर रोजी संपली. अवघ्या काही तासांमध्ये Apple त्याच्या क्युपर्टिनो-कॅम्पसमध्ये फार आऊट इव्हेंट आयोजित करेल. आजच्या या कार्यक्रमात, कंपनी नवीन iPhones, नवीन Apple Watches आणि Airpods Pro 2 सह अनेक प्रोडक्ट्सबाबत मोठ्या घोषणा करू शकते.
हे सुद्धा वाचा : कुटुंबातील 5 सदस्यांसाठी भारी प्लॅन! वर्षभर मोफत मिळेल NETFLIX, डेटा-कॉल देखील अमर्यादित
Apple कंपनीच्या क्यूपर्टिनो कॅम्पसमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये इन-पर्सन इव्हेंट आयोजित करेल. हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता सुरू होईल. तुम्ही Apple TV, अधिकृत Youtube चॅनेल आणि Apple वेबसाइटवर इव्हेंट थेट ऑनलाइन पाहू शकता. नवीन iPhone 14 सिरीज आज Apple 'Far Out' इव्हेंटमध्ये लाँच होणार आहे.
Apple आजच्या कार्यक्रमात iPhone 14 सिरीज लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. रिपोर्ट्सनुसार, APPLE यावेळी 'iPhone मिनी' लॉन्च करणार नाही. त्याऐवजी, 6.7-इंच लांबीचा डिस्प्ले असलेला मोठा iPhone ऑफर केला जाईल, ज्याला "iPhone 14 Plus" असे सांकेतिक नाव असेल. Apple iPhone 14 सिरीज चार मॉडेलमध्ये लॉन्च करेल: 6.1-इंच डिस्प्लेसह iPhone 14; 6.7-इंच डिस्प्लेसह iPhone 14 Plus; 6.1-इंच डिस्प्लेसह iPhone 14 Pro; आणि iPhone 14 Pro Max मध्ये 6.7-इंच लांबीचा डिस्प्ले आहे.
Apple iPhone 14 ची भारतात अंदाजे किंमत 79,990 रुपये आहे आणि iPhone 14 Max ची किंमत 90,000 रुपये आहे. iPhone 14 Pro ची किंमत 87,838 रुपये आणि iPhone 14 Pro Max ची किंमत 95,830 रुपये असेल.
Apple Watch Series 8 कमीत कमी बदलांसह Apple Watch Series 7 प्रमाणे दिसण्याचा अंदाज आहे. ऍपल वॉचमध्ये फास्ट परफॉर्मन्ससाठी 41-45mm साईज ऑप्शन आणि S8 चिप असेल. वॉच 8 सीरिजमध्ये रग्ड प्रो व्हेरिएंट असण्याची अपेक्षा आहे जी हायकर्स आणि बाइकर्स यांसारख्या क्रीडाप्रेमींसाठी असेल.
APPLE चे नवीन वायरलेस इअरबड्स उत्तम डिझाइन आणि सुधारित नॉईज कॅन्सलिंग टेक्नॉलॉजीसह येतील. या उपकरणात नेक्स्ट जनरेशन प्रोसेसर H1 बसवण्यात येणार आहे. AirPods Pro 2 चांगल्या साउंड कॉलिटीसाठी Apple च्या लॉसलेस ऑडिओ कोडेक (ALAC) किंवा ब्लूटूथ (ब्लूटूथ 5.2) चे समर्थन करेल.