Apple ने iOS 17 सॉफ्टवेअर WWDC 2023 इव्हेंटमध्ये सादर केले.
नव्या सॉफ्टवेअरसह युजर्सचा iPhone वापरण्याच्या अनुभव पूर्णपणे बदलणार आहे.
व्हॉइसमेल फिचर, मोशन स्टिकर इ. बरेच टॉप फीचर्स मिळणार
WWDC 2023 इव्हेंटमध्ये Apple ने iOS 17 सॉफ्टवेअर आणले आहे. त्याबरोबरच, इवेंटमध्ये Apple ने नवीन 15 इंच लांबीचा MacBook Air आणि नवीन Mac Studio लाँच केला आहे. यामुळे आगामी काळात iPhone वापरताना वापरकर्त्यांना नवीन आणि खास अनुभव मिळणार आहे. iOS 17 अपडेट iPhone XS, iPhone XS Max, iPhone XR, iPhone 11, iPhone 12 Series, iPhone 13 Series, iPhone 14 सिरीजसाठी उपलब्ध होणार आहे.
नव्या सॉफ्टवेअरमध्ये काय मिळेल खास ?
– iOS 17 मध्ये वापरकर्त्यांना लाइव्ह व्हॉइस मेल फिचर मिळेल. तसेच, व्हॉइसमेलचे रिअल टाइम ट्रान्सलेशन फिचर मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही कोणत्याही व्हॉइसचे रियल टाइम भाषांतर करू शकणार आहात. त्याबरोबरच, इंटरनेट नसेल तर रिअल टाइम मॅप देखील वापरता येईल.
– iPhone युजर्स आता कोणत्याही फोटोवरून सब्जेक्टचे स्टिकर्स तयार करू शकतील. विशेष म्हणजे, मोशन फोटो वापरून लाइव्ह स्टिकर्स देखील तयार करता येतील.
– नवीन सॉफ्टवेअर FaceTime फीचरसह येतोय. जर एखाद्याने कॉल मिस केला असेल तर, हा फीचर व्हिडिओ मॅसेज पाठवू शकतो.
– iMessages साठी सर्च फिल्ट अपडेट केला गेला आहे. म्हणजे वापरकर्ते फक्त स्वाइप करून उत्तर देऊ शकतात. याशिवाय ऑडिओ मेसेज ऑटोमॅटिक ट्रान्सक्राइब होतील. त्याबरोबरच, iMessages ची लोकेशन देखील शेअर करता येईल.
महत्त्वाचे :
iOS 17 सॉफ्टवेअर अपडेट सप्टेंबरच्या मध्यापर्यंत iPhone वर येण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये लाँच होणार्या iPhone 15 मध्ये देखील नवीनतम iOS 17 अपडेट दिले जाईल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.