अॅप्पलने 32GB आणि 128GB मेमरी संस्करणसह सादर केला आहे, ज्याची किंमत क्रमश: 799 अमेरिकी डॉलर आणि 949 अमेरिकी डॉलर आहे. १२८जीबी मॉडेल सेल्यूलर पर्यायासहित सुद्धा उपलब्ध आहे. ज्याची किंमत 1,079 अमेरिकी डॉलर आहे.
अॅप्पल आयपॅड प्रो टॅबलेट १३ नोव्हेंबरपासून सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. अॅप्पलने ९ सप्टेंबरला सेन फ्रान्सिकोमध्ये आयोजित कार्यक्रमात अॅप्पल आयफोन 6S आणि आयफोन 6S प्लससह नवीन आयपॅड प्रोसुद्धा सादर केला होता.
अमेरिकेच्या प्रमुख ऑनलाइन रिटेलरने ह्यासाठी प्री-बुकिंग सुरु केली आहे. ह्याआधी दिल्या गेलेल्या माहितीत अॅप्पल आयपॅड प्रो 11 नोव्हेंबरला सेलसाठी उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र कंपनीने आता २ दिवसांच्या लांबणीवर टाकले आहे.
अॅप्पलने ३२जीबी आणि १२८ जीबी मेमरी संस्करणमध्ये ह्याला सादर केले आहे, ज्याची किंमत क्रमश: ७९९ अमेरिकी डॉलर आणि ९४९ अमेरिकी डॉलर आहे. १२८ जीबी मॉडल सेल्युलर पर्यायासह सुद्धा उपलब्ध आहे, ज्याची किंमत १,०७९ अमेरिकी डॉलर आहे.
आयपॅड प्रो नावाने प्रदर्शित केलेला हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपॅड आहे. ह्याच्या आधी अॅप्पल आयपॅडचे सुद्धा संस्करण ९.७ इंच आणि आयपॅड मिनी ७.९ इंचाची स्क्रीन उपलब्ध आहे. तर अॅप्पल आयपॅड प्रोमध्ये १२.९ इंचाची डिस्प्ले आहे.
आयपॅड प्रोच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात अॅप्पल A9 चिपसेट दिला गेला आहे. त्याचबरोबर अॅप्पल आयपॅड प्रोमध्ये ८ मेगापिक्सेलचा आयसाइट कॅमेरासुद्धा दिला आहे. कंपनीच्या नवीन ऑपरेटिंग सिस्टम IOS 9 वर हा काम करेल. ज्याच्या माध्यमातून अॅडव्हान्स मल्टीटास्किंग वैशिष्ट्याचा आपण आनंद घेऊ शकता.
अॅप्पल प्रोसह कंपनीने अॅप्पल पॅसिल आणि आयपॅड प्रो कव्हर लाँच केला आहे. ह्याची किंमत ९९ अमेरिकी डॉलर आणि १६९ डॉलर आहे.