मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी अॅप्पलने २१ मार्चला एका कार्यक्रमामध्ये आयफोन SE आणि ९.७ इंचाच्या डिस्प्लेवाला आयपॅड प्रो टॅबलेट लाँच केला आहे. कंपनीने ह्या कार्यक्रमात आयपॅड एयर 2 च्या किंमतीत घट करण्याची कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र आता अशी बातमी मिळत आहे की, अॅप्पलच्या आयपॅड एयर 2 च्या किंमतीत घट झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किंमतीत घट झाल्यानंतर अमेरिकेत आयपॅड एयर 2 च्या 16GB व्हर्जनची किंमत २६,००० रुपये (३९९ डॉलर) असेल. तथापि, अजूनपर्यंत भारतामध्ये आयपॅड एयर 2 च्या किंमतीबाबत खुलासा झालेला नाही. ह्याआधी आयपॅड एयर 2 च्या बेस मॉडलची किंमत जवळपास ३३,००० रुपये (499 डॉलर) होती. कंपनीच्या अमेरिका वेबसाइटवर आयपॅड एयर वायफाय मॉडलचे केवळ दोन विकल्पच उपलब्ध आहे. तथापि, वायफाय+LTE 16GB च्या प्रकारची किंमत वेबसाइटवर ३५,३०० रुपये (529 डॉलर) आहे.
कंपनीने २१ मार्चला एका कार्यक्रमात आपल्या ९.७ इंचाचा डिस्प्ले असलेला आयपॅड प्रो टॅबलेट लाँच केला. ह्या डिवाइसला अॅप्पल आयपॅड एयर 2 चे अपडेटेट व्हर्जनसुद्धा सांगितले जातय. आणि किंमतीमध्ये घट केल्यानंतर ह्याबद्दल उत्सुकता आणखीनच वाढलीय.
हा नवीन टॅबलेट ४ रंगात मिळेल. ज्यात रोझ गोल्डचा सुद्धा समावेश आहे. ह्याच्या किंमतीविषयी बोलायचे झाले तर हा ९.७ इंचाचा हा आयपॅड प्रोच्या 32GB वेरिएंटची किंमत ५९९ डॉलर आहे. तर ह्याच्या 128GB वेरिएंटची किमत 749 डॉलर आहे आणि 256GB वेरिएंटची किंमत ८९९ डॉलर आहे.
हे पाहा – पेबल टाईम स्मार्टवॉच अनबॉक्सिंग Video
ह्या नवीन टॅबलेटच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 9.7 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 2048×1536 पिक्सेल आहे. हा डिवाइस A9X प्रोसेसर आणि 4GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे.
त्याचबरोबर ह्यात 12 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा देण्यात आला आहे.
हेदेखील वाचा – ह्या अॅप्सच्या मदतीने तुमची होळी बनवा अजून खास
हेदेखील वाचा – होळीचा आनंद द्विगुणित करतील हे वॉटरप्रुफ गॅजेट्स