Apple चा बहुप्रतिक्षित फेस्टिव्ह सेल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 15 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू झाला आहे. सेल दरम्यान, Apple लव्हर्सना iPhone, iPads, Macs, AirPods आणि स्मार्टवॉच अशा Apple च्या विविध प्रोडक्ट्सवर बंपर डील आणि सवलतीच्या ऑफर्स मिळतील. कंपनीने सणासुदीच्या काळात उपलब्ध असलेल्या ऑफर्सचा अप्रतिम तपशीलही उघड केला आहे.
हे सुद्धा वाचा: UPI सपोर्टसह JioBharat B1 नवा Affordable Feature फोन भारतात लाँच, किंमत 1300 रुपयांपेक्षा कमी। Tech News
आम्ही तुम्हाला सांगतो की, सेलमध्ये ग्राहकांना HDFC कार्डद्वारे झटपट सूट देखील मिळेल. जर तुम्ही Apple लवर असाल आणि स्वतःसाठी नवीन Apple प्रोडक्ट्स खरेदी करण्याचा विचार करायचा असेल, तर Appleचा फेस्टिव्ह सेल तुमच्यासाठी फायदेशीर डील ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊयात सेलदरम्यान मिळणाऱ्या सर्व ऑफर्स-
HDFC कार्डधारकांना Apple India Diwali Sale मध्ये आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सेल दरम्यान HDFC कार्डद्वारे खरेदी केल्यास 10,000 रुपयांपर्यंतची झटपट सूट ऑफर दिली जाईल. iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max इ. वर तुम्हाला HDFC कार्डद्वारे 6000 रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळेल. याशिवाय, iPhone 15 आणि iPhone 15 Plus वर कार्डद्वारे 4,000 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे.
जर तुमचे बजेट थोडे कमी असेल तर तुम्ही सेलमध्ये iPhone 14 आणि इतर सीरीजचे फोन देखील स्वस्तात खरेदी करता येतील.
MacBook Air M2 13-इंच आणि 15-इंच मॉडेल्स, MacBook Pro 13-इंच, 14-इंच आणि 16-इंच मॉडेल्स आणि बॅंक कार्डद्वारे मॅक स्टुडिओवर 10,000 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच, Apple HomePod आणि AirPods Pro खरेदीवर 2000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. सेल दरम्यान 6 महिन्यांपर्यंतची नो-कॉस्ट EMI देखील ऑफर केले जात आहे. याव्यतिरिक्त, एक्सचेंज ऑफरसह ग्राहकांना 67,800 रुपयांपर्यंत सूट मिळेल.