Apple Glowtime Event 2024: जाणून घ्या भारतात केव्हा आणि कुठे पाहता येईल LIVE स्ट्रीम, पहा कोणती उपकरणे होणार लाँच

Apple Glowtime Event 2024: जाणून घ्या भारतात केव्हा आणि कुठे पाहता येईल LIVE स्ट्रीम, पहा कोणती उपकरणे होणार लाँच
HIGHLIGHTS

आज म्हणजेच 9 सप्टेंबर 2024 रोजी Apple आपला वर्षातील मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहे.

इव्हेंटमध्ये लेटेस्ट iPhone 16 सीरीजसोबतच इतर अनेक उत्पादनांचे अनावरण केले जाईल.

ऍपल इंटेलिजेंट (AI) चे देखील कार्यक्रमात अनावरण केले जाईल.

Apple Glowtime Event 2024: iPhone लव्हर्सची प्रतीक्षा आज संपुष्टात येणार आहे. होय, कारण आज म्हणजेच 9 सप्टेंबर 2024 रोजी Apple आपला वर्षातील मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहे. या इव्हेंटमध्ये लेटेस्ट iPhone 16 सीरीजसोबतच इतर अनेक उत्पादनांचे अनावरण केले जाईल. याव्यतिरिक्त, ऍपल इंटेलिजेंट (AI) चे देखील कार्यक्रमात अनावरण केले जाईल. सर्वांना हा कार्यक्रम LIVE पाहता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात, हा इव्हेंट कधी आणि केव्हा लाईव्ह पाहता येईल.

Apple Glowtime Event 2024

Apple इव्हेंट 2024 आज, 9 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 10:30 वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, सॅन फ्रान्सिस्कोमधील ॲपल पार्कमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र, Apple च्या यूट्यूब चॅनलवर हा इव्हेंट लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय, तुम्ही कंपनीच्या सोशल मीडिया चॅनेलवर देखील हा इव्हेंट लाईव्ह पाहू शकणार आहेत.

इतकंच नाही तर Apple च्या अधिकृत वेबसाइट Apple TV वर लाइव्ह स्ट्रीमिंगही होणार आहे. वरील लिंकवर क्लिक करूनही तुम्ही हा कार्यक्रम थेट पाहण्यास सक्षम असाल.

इव्हेंटदरम्यान कोणते प्रोडक्ट्स होणार लाँच?

आज या इव्हेंटमध्ये Apple आपली नेक्स्ट जनरेशन iPhone सीरीज म्हणजेच iPhone 16 सीरीज लाँच करणार आहे. या सीरीजअंतर्गत चार फोन iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max लॉन्च केले जातील. आम्ही तुम्हाला सांगतो की, यंदा सिरीजमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे iPhone मध्ये हे टाईम कॅप्चर बटण दिसेल. तसेच, iPhone iOS 18 सह आणला जाईल.


Apple Glowtime Event 2024

याव्यतिरिक्त, Apple Watch Series 10, Watch Ultra 3 आणि Airpods 4th Generation देखील कार्यक्रमात लाँच केले जातील. या कार्यक्रमात Apple AI चे अनावरणही केले जाईल. त्याबरोबरच, iOS 18 चे अनेक आकर्षक फीचर्स सांगितले जातील. Apple Siri ला देखील इव्हेंटमध्ये अपडेट मिळेल. याशिवाय, कंपनीच्या इतर सेवांसाठी नवीन फीचर्स सादर केले जाऊ शकतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo