Apple Diwali Offer 2024: सर्व प्रोडक्ट्सवर तब्बल 10,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक, iPhone सह इयरबड्स देखील Free! 

Apple Diwali Offer 2024: सर्व प्रोडक्ट्सवर तब्बल 10,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक, iPhone सह इयरबड्स देखील Free! 
HIGHLIGHTS

Apple Festive Season दरम्यान लोकांना प्रोडक्ट्सवर 10,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार

Apple ने इ-कॉमर्स साईट Flipkart आणि Amazon वर दिवाळी ऑफर लाईव्ह केले.

दिवाळी ऑफरमध्ये iPhone सोबत मोफत बड्स देखील मिळणार

Apple Diwali Offer 2024: सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध टेक जायंट Apple ने इ-कॉमर्स साईट Flipkart आणि Amazon वर दिवाळी ऑफर लाईव्ह केले आहे. Apple Festive Season दरम्यान लोकांना प्रोडक्ट्सवर 10,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. एवढेच नाही तर, कंपनी iPhone सोबत मोफत बड्स देखील गिफ्ट करत आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, MacBook, iPad इ. उपकरणे Apple च्या अधिकृत वेबसाइटवरून मोठ्या सवलतीत खरेदी करता येतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता Apple च्या सर्व प्रोडक्ट्सवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात-

Apple Diwali Offer 2024

Apple च्या अधिकृत वेबसाइटनुसार, Axis, ICICI आणि American Express बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 10,000 रुपयांपर्यंतची झटपट कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. त्याबरोबरच, या प्रोडक्ट्सवर 12 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI चा पर्याय देखील असेल. प्रत्येक प्रोडक्टवरील ऑफर सविस्तरपणे जाणून घेऊयात.

iPhones वरील ऑफर्स

iPhone ऑफर्समध्ये कंपनी iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max वर 5000 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. त्याचप्रमाणे, iPhone 16 आणि iPhone 16 Plus वर देखील 5000 रुपयांची कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. याव्यततीरिक्त, iPhone 14 आणि iPhone 14 Plus वर 3000 रुपयांचा कॅशबॅक आणि iPhone SE खरेदी केल्यावर 2000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

एवढेच नाही तर, तुम्हाला iPhone 15 आणि iPhone 15 Plus सोबत Beats Solo Buds फेस्टिव्ह स्पेशल एडिशन मोफत मिळेल. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे, जी फक्त 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत वैध असेल.

Apple Watch वरील ऑफर्स

apple watch 10 series

Apple Watch Ultra 2 वर 6000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. Apple Watch Series 10 वर 4000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. तर, Apple Watch SE 2 वर 2000 रुपयांचा कॅशबॅक उपलब्ध असणार आहे.

Airpods वरील ऑफर्स

Apple AirPods Pro वर 2000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. AirPods 4 वर 1500 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. AirPods 4 Active Noise Cancelation वर 1500 रुपयांचा कॅशबॅक आणि AirPods Max वर 4000 रुपयांचा कॅशबॅक उपलब्ध आहे.

iPad आणि MacBook वरील ऑफर्स

iPad Pro वर 11 इंच आणि 13 इंच लांबीचा 6000 रुपयांचा कॅशबॅक आहे. तर, iPad Air 11 इंच आणि 13 इंच वर 4000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. त्याबरोबरच, iPad वर 2500 रुपये आणि iPad mini वर 3000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

एवढेच नाही तर, MacBook Air (M3 चिप) 13 आणि 15 इंच वर 10,000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. MacBook Air (M2 चिप) 13 इंच वर तब्बल 8000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. त्याबरोबरच, MacBook Pro 14 इंच आणि 16 इंच वर 10,000 रुपयांचा कॅशबॅक, Mac Studio वर 10,000 रुपये, iMac 24 इंच वर 10000 रुपये आणि Mac mini वर 4000 रुपयांची कॅशबॅक ऑफर उपलब्ध आहे. या ऑफर्सबद्दल सविस्तर माहितीसाठी Apple च्या अधिकृत साईटला भेट द्या.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo