iPad ला स्मार्ट डिस्प्लेमध्ये रूपांतरित करण्याच्या तयारीत Apple, जाणून घ्या सविस्तर
Apple iPadचा डिस्प्ले आता स्मार्ट डिस्प्ले होणार
Apple लवकरच iPad Pro चे अनावरण करणार
Pro मॉडेल 12.9-इंच मॉडेल्स आणि M2 सिलिकॉन चिपसह येण्याची शक्यता
Apple आपल्या iPad ला स्मार्ट डिस्प्ले आणि स्पीकरमध्ये बदलण्यासाठी काम करत आहे. जो फेसबुक पोर्टल किंवा Amazon इको शो स्मार्ट होम डिव्हाइससारखे कार्य करेल. ब्लूमबर्गच्या मार्क गुरमनच्या मते, टेक दिग्गज पुढच्या वर्षी लवकरात लवकर आपल्या iPads मध्ये या स्मार्ट क्षमतांचा परिचय करून देण्यात असल्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा : त्वरा करा ! Redmi A1+ जबरदस्त स्मार्टफोनची पहिली सेल आज, फक्त 6,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी
iPad डॉकिंग स्टेशन वापरकर्त्यांना FaceTime द्वारे कॉल करण्याची आणि स्मार्ट होम डिव्हाइसेसवर हँड्स-फ्री करण्याची परवानगी देऊ शकतो. हे ऍमेझॉन फायर टॅबलेटसारखेच असेल, ज्यामध्ये वापरकर्त्यांना चार्जिंग डॉकमध्ये स्मार्ट डिस्प्ले ठेवण्याची सुविधा मिळेल.
Google ने गेल्या आठवड्यात त्याच्या आगामी पिक्सेल टॅब्लेटसाठी डॉकिंग ऍक्सेसरीची घोषणा केली, जी होम ऍपद्वारे स्मार्ट होम डिव्हाइसेस नियंत्रित करण्यासाठी नेस्ट हब मॅक्स म्हणून काम करेल. Apple लवकरच iPad Pro चे अनावरण करणार आहे, जे 11-इंच आणि 12.9-इंच मॉडेल्स आणि M2 सिलिकॉन चिपसह येण्याची शक्यता आहे.
रिपोर्टनुसार, Apple होमपॅडच्या अपडेटेड व्हर्जनवरही काम करत आहे. होमपॅडच्या पुढील जनरेशनमध्ये अपडेटेड डिस्प्ले, एक S8 चिप आणि मल्टी-टच कार्यक्षमता असेल, अशी माहिती मिळाली आहे.
कंपनी सिंगल कॅमेराने सुसज्ज Apple टीव्ही आणि स्मार्ट स्पीकर डिव्हाइसची देखील योजना करत आहे. Apple ने अलीकडे तैवान सरफेस माउंटिंग टेक्नॉलॉजी (SMT) सह साइन अप केले आहे, जे 2024 पर्यंत आयपॅड प्रो मध्ये हायब्रीड OLED डिस्प्ले वापरण्यासाठी या टेक दिग्गजला पुढे घेऊन जाणार आहे. iPad आणि iPad Proचा डिस्प्ले वापरकर्त्यांना सर्वोत्तम अनुभव देईल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile