AP FiberNet: अत्यंत कमी किंमतीचा इंटरनेट पॅक लाँच

Updated on 18-Mar-2016
HIGHLIGHTS

ह्या इंटरनेट पॅकमध्ये 15 Mbps ब्रॉडबँड इंटरनेट पॅक केवळ १४९ रुपये तर 100Mbps केवळ ९९९ रुपयातं उपलब्ध होणार आहे.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी गुरुवारी विशाखापट्टणममध्ये AP फायबरनेट नावाचा नवीन इंटरनेट पॅक लाँच केला. कमी किंमतीत मिळणारा हा इंटरनेट पॅक आंध्रप्रदेशातील लोकांसाठी खूपच फायदेशीर ठरणारा आहे.

 

ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून लोकांना कमी किंमतीचे ब्रॉड बँड  इंटरनेट देण्याचा आंध्रप्रदेश सरकारचा प्रयत्न आहे. कमी किंमतीत मिळणारा हा इंटरनेट पॅक आंध्रप्रदेशातील नागरिकांना तसेच नोकरदार वर्गाला खूपच फायदेशीर ठरणारा असा पॅक असेल असे सांगण्यात येतय.

व्यावसायिक क्षेत्रात इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेता आंध्रप्रदेश सरकारने हे एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ह्या इंटरनेटच्या अंतर्गत तुम्हाला दर महिना १४९ रुपयात 15Mbps स्पीड असलेला इंटरनेट पॅक मिळेल. तसेच ऑफिसेससाठी 100Mbps स्पीड असलेला इंटरनेट पॅक केवळ ९९९ रुपयात मिळेल. आंध्र प्रदेश सरकार ज्या किंमतीत हे इंटरनेट देत आहे, ते सध्याच्या इतर इंटरनेट सेवा प्रदात्यांपेक्षा कित्येक पटींने कमी आहे.

हेदेखील पाहा – पेबल टाईम स्मार्टवॉच अनबॉक्सिंग Video

तसेच आज ऑफिसांमध्ये जितका इंटरनेटचा वापर केला जातो तितका किंवा त्यापेक्षा कमी का होईना, पण घरातही इंटरनेटचा वापर होतो. पण कधीकधी स्पीड कमी असल्यामुळे किंवा जास्त स्पीड असलेल्या इंटरनेटच्या किंमतीमुळे आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणूनच “ह्या इंटरनेटच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना उत्कृष्ट सेवा उपलब्ध करुन देणे आणि आंध्रप्रदेश राज्य व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनवणे हाच आमचा प्रमुख उद्देश असल्याचे” आंध्रप्रदेश सरकारने सांगितले.

ह्या प्रोजेक्टसाठी ३३३ करोड रुपयाची गुंतवणूक करण्यात आली आहे. आणि हा हळूहळू जुलै २०१६ पर्यंत ही योजना महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत पोहोचवली जाईल असेही सांगण्यात येतय.

AP FiberNet च्या माध्यमातून १.३ करोड घरांपर्यंत पोहोचण्याची सरकारची योजना असल्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले आहे.

हेदेखील वाचा – हायपरअडाप्ट 1.0: Nike ने लाँच केला हा स्मार्ट बूट

हेदेखील वाचा – अॅमेझॉन, फ्लिपकार्ट ह्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सशी फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :