कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच (Artificial Intelligence) AI ही भविष्यातील संकल्पनेतून आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून खूप वेगाने विकसित होत आहे. विशेषतः स्मार्टफोन्सच्या क्षेत्रात हे परिवर्तन लक्षणीय आहे. AI क्षमता वापरकर्त्याच्या अनुभवाला अधिकाधिक परिभाषित करत आहेत. स्मार्टफोन्समध्ये AI चे वाढते महत्त्व ओळखून आम्ही Digit वर Digit AI-Q स्कोअरिंग सिस्टम विकसित केली आहे. ही डिव्हाइसच्या AI कार्यक्षमतेचे मूल्यमापन करण्याची एक पद्धत म्हणून विकसित करण्यात आली आहे. ही सिस्टम पब्लिशिंग इंडस्ट्रीमधील कस्टमर इलेक्ट्रॉनिक्ससाठी AI परफॉर्मन्सचे पहिले प्रमाणित माप होय.
या तांत्रिक प्रगतीवर भाष्य करताना, अध्यक्ष आणि COO (डिजिटल, टाइम्स नेटवर्क) रोहित चड्डा म्हणाले की, “आम्ही आमच्या धोरणात्मक वाढीच्या उपक्रमांचा एक भाग म्हणून Digit ला समाविष्ट केले आहे आणि ते विकासाच्या पुढील टप्प्यात नेण्यासाठी सज्ज आहोत. AI-Q हा खरोखरच या काळातील एक महत्त्वाचा नवोपक्रम आहे आणि तंत्रज्ञान उद्योगात Digit च्या विचार नेतृत्वाचे प्रदर्शन करणारा नवीन बेंचमार्क सेट करतो.”
पुढे ते म्हणाले की, “जनरेटिव्ह AI चा उदय आणि सर्व प्रकारच्या उपकरणांमध्ये त्याचे एकत्रीकरण, Digit वापरकर्त्यांना त्यांच्या गॅझेटच्या खऱ्या AI क्षमता समजून घेण्यास सक्षम करते. 80 मॉडेल्स आणि AI कार्यप्रदर्शनाच्या 180 पेक्षा जास्त पैलूंचा समावेश असलेली आमची बेंचमार्किंग प्रक्रिया, गती, अचूकता आणि सुरुवातीच्या वेळेचे (initialization time) सर्वसमावेशक मूल्यमापन सुनिश्चित करते.”
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, अलीकडेच Times Network ने “Digit’ विकत घेतले आहे, जे त्यांच्या डिजिटल प्रकाशन व्यवसायात त्याच्या सततच्या गुंतवणुकीला चालना देत आहे. हे आधीच 110 दशलक्ष मासिक सक्रिय वापरकर्त्यांपर्यंत पोहोचले आहे आणि 1 अब्जाहून अधिक मासिक व्हिडिओ व्ह्युज मिळवली आहेत.
Digit’s AI-Q (AI Quotient) ही एक मालकीची स्कोअरिंग सिस्टम आहे, जी स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टेलिव्हिजनसह विविध उपकरणांच्या AI क्षमतेचे मूल्यांकन करते. AI-Q स्कोअर वापरकर्त्यांना त्यांच्या गॅझेटमधील AI फीचर्सची स्पष्ट माहिती देते, याद्वारे युजर्सना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होईल. AI Quotient एका विस्तृत चाचणी प्रक्रियेतून तयार झाला आहे. ज्यामध्ये उपकरणांच्या न्यूरल प्रोसेसिंग युनिट (NPU) वर आयोजित केलेल्या 80 AI आणि कंप्यूटर व्हिजन टेस्टिंगचा समावेश आहे.
दरम्यान या टेस्टिंगमध्ये ऑब्जेक्ट रेकग्निशन/क्लासिफिकेशन, सिमेंटिक सेगमेंटेशन, पॅरलल ऑब्जेक्ट रेकग्निशन, ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन, ऑब्जेक्ट ट्रॅकिंग, इमेज आणि व्हिडिओ प्रोसेसिंग, फेस रेकग्निशन, कॅमेरा सीन डिटेक्शन, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग इ. विविध बाबींचा समावेश होतो. कठोर बेंचमार्किंग प्रक्रिया AI कार्यप्रदर्शनाच्या 180 हून अधिक विविध पैलूंचे परीक्षण करते, ज्यामध्ये वेग, अचूकता आणि आरंभिकरण वेळ (initialization time), सर्वसमावेशक आणि सर्वांगीण मूल्यमापन सुनिश्चित करणे, यांचा समावेश आहे.
ग्राहकांना नवीनतम माहितीसह सक्षम करण्याच्या आमच्या सतत प्रयत्नांचा एक भाग म्हणून, आम्ही आमच्या वेबसाइटवर Digit-AI-zed हा नवीन विभाग देखील सादर केला आहे. हे डेडिकेटेड सेक्शन सर्व AI-संबंधित बातम्या आणि रिव्ह्यूज, AI तंत्रज्ञानातील नवीनतम प्रगती शोधणाऱ्या वापरकर्त्यांना आणि उद्योगाती लीडर्ससाठी सर्वसमावेशक स्रोत म्हणून काम करेल.