एंड्राइड Q च्या नवीन “मल्टी-रिज्यूम” फीचर मुळे एकाच वेळी वापरता येतील मल्टीपल ऍप्स
Google च्या नवीन एंड्राइड Q OS मध्ये नवीन मल्टी-रिज्यूम फीचर सामील करण्यात येईल ज्याच्या माध्यमातून एकाच वेळी मल्टीपल ऍप्सचा वापर केला जाऊ शकतो आणि हा फीचर खासकरून फोल्डेबल स्मार्टफोन्स लक्षात घेऊन सादर केला जात आहे.
गूगलचा आगामी एंड्राइड वर्जन एंड्राइड Q नवीन “मल्टी-रिज्यूम” फीचर सह येईल, ज्याच्या माध्यमातून दोन ऍप्स एक साथ वापरता येतील. माउंटेन व्यू कंपनी ने अपनी डेवलपर समिट मध्ये घोषणा केली कि हे फीचर फोल्डेबल स्मार्टफोन्स साठी एंड्राइड सपोर्टचा भाग म्हणून सादर केला जाईल.
गूगलच्या इंजिनियरिंग चे VP Dav Burke ने फोल्डेबल डिस्प्ले वर एंड्राइड कशा प्रकारे दिसेल हे समजावले. नवीन मल्टी-रिज्यूम फीचर अगले एंड्राइड वर्जनचा अनिवार्य फीचर बनून जाईल. या फीचर मुले एकाच वेळी मल्टीपल ऍप्स ओपन करून वापरात येतील. मल्टी-विंडो मोड मध्ये डेवलपर्सना ऍप्स रिज्यूम ठेवण्याचा पर्याय मिळेल ज्यामुळे चांगल्या पद्धतीने अतिरिक्त स्क्रीन रियल एस्टेट चा वापर करता येईल.
सॅमसंगच्या गुड लॉक ऍप मध्ये आधीपासूनच मल्टीस्टार मोड्यूल मध्ये मल्टी-रिज्यूम फीचर उपलब्ध आहे. गूगल च्या आताच्या घोषणेनंतर मल्टी-रिज्यूम फीचरला एंड्राइड डिवाइसेज मध्ये नेटिव सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.
XDA Developers च्या रिपोर्ट नुसार, फीचर टेस्ट करण्यासाठी OEM आणि ऍपला मधील एंड्राइड पाई डिवाइस वर ऑप्ट-इन करावे लागेल. रिपोर्ट अनुसार, कोणत्याही स्मार्टफोन मध्ये मल्टी-रिज्यूम सपोर्ट आणण्यासाठी हा अपडेटकरावा लागेल.
मल्टी-विंडो फंक्शन सध्या एंड्राइड च्या अनेक फॉर्म्स मध्ये उपस्थित आहे. स्प्लिट-स्क्रीन आणि फ्री फॉर्म 2016 मध्ये एंड्राइड नोगट मध्ये सादर करण्यात आले होते. गूगल ने नंतर एंड्राइड ओरियो OS मध्ये पिक्चर-इन-पिक्चर मोड सामील केला पण स्प्लिट स्क्रीन फंक्शनालिटी ने एकाच टॅब मध्ये दोन ऍप्स उघडता येतात, आणि फक्त एक ऍप एक्टिव असतो तर दुसरा पॉज होतो. नवीन मल्टी-रिज्यूम फीचर सोबत गूगल हि लिमिटेशन संपवू पाहत आहे. XDA Developers चे म्हणणे आहे कि फोल्डेबल डिवाइसेजना मल्टी-रिज्यूम सपोर्टचा लाभ होईलच तसेच मोठा डिस्प्ले असलेले स्मार्टफोन्स पण या नवीन फीचरचा वापर करू शकतील.