Google ने केली AI इंटीग्रेशन सह एंड्राइड P ची घोषणा, जाणून घ्या काय आहे नवीन
Google ने एंड्राइड P साठी ओपन बीटा प्रोग्राम ची पण घोषणा केली आहे आणि पहिल्यांदाच नॉन-गूगल फोन्स पण या प्रोग्राम मध्ये भाग घेऊ शकतील, ज्यात आगामी OnePlus 6 पण आहे.
मंगळवारी रात्री झालेल्या मंगलवार Google I/O मध्ये कंपनी ने एक पेक्षा एक अनेक रोमांचक घोषणा केल्या आणि शेवटी पुढील एंड्राइड वर्जन ची झलक पण बघायला मिळाली. एंड्राइड च्या नवीन वर्जनला P कॉडनेम देण्यात आले आहे, पण हे माहीत नाही झाले की हा कोणत्या डेजर्ट च्या रुपात ओळखला जाईल. आता आपल्याला अंदाज लावण्याची गरज नाही की पुढील मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम मध्ये आपल्याला Google कडून काय मिळणार आहे.
AI द्वारा संचालित OS ची सुरवात
Google चे म्हणणे आहे की एंड्राइड P आर्टिफिशियल इंटेलिजेंस सोबत मूळ ऑपरेटिंग सिस्टम सुरू होईल. Google चे इंजीनियरिंग वाईस प्रेसिडेंट (एंड्राइड) Dave Burke ने सांगितले की बॅटरी लाइफ आता पर्यंत एक चिंतेचा विषय होता. एंड्राइड P चा AI चोप्स तुमच्या अॅप यूसेज पॅटर्न चे विश्लेषण करेल आणि CPU बिहेवियर आशा प्रकारे कण्ट्रोल करण्यवार लक्ष्य केन्द्रित करेल जेणेकरून गरजेचे अॅप्सच किंमती रिसोर्स वापरू शकतील. म्हणजे, Google AI चा वापर यूसेज पॅटर्न चा अभ्यास करण्यासाठी आणि CPU समायोजित करण्यासाठी करेल. Burke ने सांगितले इंटरनल टेस्ट मध्ये हा 30 टक्क्यांपर्यंत चांगली बॅटरी लाइफ ऑफर करण्यास सक्षम होता
सहज वापर
एंड्राइड P वर काम करणार्या इंजिनीरिंग टीम चे जास्त लक्ष ऑपरेटिंग सिस्टम यूजर्सना इंटरॅक्ट करण्यासाठी सोप्पी बनवण्यावर आहे. रुमर मध्ये असलेल्या नवीन जेस्चर-आधारित UI नेविगेशन सिस्टम बद्दल माहिती समोर आली आहे (आणि ही पर्यायी व्यवस्था आहे). एक युनीक रोटेशन कन्फर्मेशन सेटिंग देण्यात आली आहे ज्यातून तुम्ही प्रत्येक अॅप साठी रोटेशन प्रेफेरेंस ठेऊ शकता आणि ही यूजर्सना वोल्यूम कण्ट्रोल सेट करण्याची परवानगी पण देते. आता जर तुम्ही वोल्यूम रॉकर हिट केल्यास एंड्राइड P रिंगर वोल्यूम ऐवजी डिफॉल्ट रूपाने मीडिया वोल्यूम एडजस्ट करेल. क्विक सेटिंग्स मेनूला पण पूर्णपणे नवीन लुक दिला गेला आहे. आता जर तुम्हाला कॉल आला तर त्याची पद्धत पण बदलली आहे कॉल आता क्विक सेटिंग्स पॅनल मध्ये वाइट बॉक्स प्रमाणे दिसतो.
डिजिटल वेलबींग
Google ला माहीत आहे की एक अशी पद्धत गरजेची आहे ज्याने लोक आपल्या फोन्स सोबत किती वेळ घालवतात ते मॉनिटर करता येईल. Google ने एक पाऊल पुढे टाकत यावर लक्ष दिले आहे की लोक आपल्या फोन्स मधील अॅप्स सोबत काय करतात, लोक कितीवेळा डिवाइस अनलॉक करतात आणि का करतात याची माहिती मिळणे आवश्यक आहे. यासाठी एंड्राइड डॅशबोर्ड आहे, या टूल ने तुम्हाला समजेल की तुम्ही कशा प्रकारे आणि कशासाठी फोन वापरता. तुम्ही अॅप्स वर टाइमर पण सेट करू शकता ज्याने तुम्ही ते अॅप्स वापरण्याची वेळ नियंत्रित करू शकाल. एकदा प्री-डिफाइन टाइम लिमिट संपली की आइकॉन ग्रेस्केल होईल ज्याने तुम्हाला कळेल की तुमची लिमिट पूर्ण झाली आहे. Google ने एंड्राइड P मध्ये विंड डाउन मोड पण समाविष्ट केला आहे ज्याने अंधार झाल्यावर नाईट लाइट ऑन होईल आणि डू नॉट डिस्टर्ब टर्न ऑन होईल. तुम्ही निवडलेल्या झोपण्याच्या वेळी डिवाइस ची स्क्रीन ग्रेस्केल वर फेड होईल.
ऑपरेटिंग सिस्टम ला नवीन लुक देण्यासाठी तीन मोठया फीचर्स व्यतिरिक्त एंड्राइड P मध्ये विजुअल बदल पण केले आहेत. Google ने एंड्राइड P साठी ओपन बीटा प्रोग्राम ची पण घोषणा केली आहे आणि पहिल्यांदाच नॉन-गूगल फोन्स पण या प्रोग्राम मध्ये भाग घेऊ शकतील, ज्यात आगामी OnePlus 6 पण आहे.