Android P 20 ऑगस्टला अधिकृतरित्या केला जाऊ शकतो सादर

Updated on 03-Aug-2018
HIGHLIGHTS

इंटरनेट वर समोर येणार्‍या लीक वरून बोलू शकतो की गूगल चा हा नवीन OS Pixel आणि Nexus डिवाइस वर अधिकृतपणे सादर केला जाऊ शकतो.

Google ने आधीच Android P चा फाइनल डेवेलपर प्रीव्यू रिलीज केला आहे, त्याचबरोबर कंपनी हा खुप दिवसांपासून टेस्ट पण करत आहे. गूगल कडून अजूनतरी याची अधिकृत लॉन्च डेट समोर आली नाही. पण कंपनी ने सांगितले होते की हा यावर्षी तिसर्‍या तिमाहीत लॉन्च केला जाऊ शकतो. आता प्रसिद्ध लीक्स्टर Evan Blass कडून माहिती मिळाली आहे की 20 ऑगस्टला एंड्राइड P चा फाइनल वर्जन Pixel आणि Nexus डिवाइस वर यायला सुरू होईल. 

Blass ने एका ट्विट मधून एक इमेज कॅलेंडर सर्वांसमोर ठेवला आहे, ज्यात 20 ऑगस्ट च्या तारखेवर एंड्राइड P चा लोगो दिसत आहे. तुम्ही इथे हा ट्विट बघू शकता. 

हे बातमी खरी असल्यास, गूगल लवकरच आपल्या नवीन OS ची घोषणा करू शकतो. काही दिवसांपूर्वी आलेल्या एका लीक मधून समोर आले आहे की Android P चे नाव एंड्राइड Pistachio या Pistachio ice-cream असू शकते. पण नेहमीप्रमाणे ही पण एक अफवाच राहील आणि कंपनी नवीन नाव घेऊन समोर येईल. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :