Google ने घोषणा केली आहे की एंड्राइड P म्हणजे Android 9 Android Pie नावाने ओळखला जाणार आहे. तसे पाहता हे नाव एवढे प्रसिद्ध नाही जेवढी गूगल ने या आधी वापरलेली नावे होती. म्हणजे pie डेजर्ट इत्यादी मध्ये इतका काही प्रसिध्द नाही पण गूगल ने हेच नाव आपल्या एंड्राइड च्या नवीन आणि लेटेस्ट वर्जन ला दिले आहे. विशेष म्हणजे हा अधिकृतरीत्या Google च्या Pixel स्मार्टफोन्स वर उपलब्ध पण झाला आहे.
असे बोलले जात होते की एंड्राइड 9 चे नाव एंड्राइड 9 Pedha किंवा एंड्राइड 9 Payasam असेल ही भारतीय नावे होती पण असे झाले नाही. ज्या नावाची आपण वर्षभर वाट बघत होतो, अखेरीस ते समोर आले आहे. इथे सविस्तर जाणून घ्या याच्या सर्व फीचर्स बद्दल…
पण ज्या फीचर मुळे हा आधीच्या ओएस पेक्षा चांगला वाटत होता तोच यात दिसत नाही. एंड्राइड 9 Pie चे महत्वाचे फीचर फक्त जेस्चर सपोर्ट नाही तर अजून एक नवीन फीचर जो यात मिळणार होता. ज्यामुळे हा इतर ओएस पेक्षा वेगळा आणि खास ठरणार होता, ते म्हणजे डिजिटल वेलबिंग. याच्या माध्यमातून गूगल ला आपल्या यूजर्सना त्यांच्या स्क्रीन वर जास्त कण्ट्रोल द्यायचा होता. पण गूगल ने सांगितले आहे की हे फीचर आज रिलीज झालेल्या एंड्राइड Pie मध्ये नाही. हे फीचर नंतर या ओएस मध्ये येईल असे सांगण्यात आले आहे.