मोबाईल ऍक्सेसरीजसाठी लोकप्रिय ब्रँड Ambrane ने पावरफुल पॉवर बँक Stylo Max लाँच केली आहे. ही पॉवर बँक 50,000mAh क्षमतेसह येते. हे उपकरण विशेषतः पर्वतांमध्ये प्रवास आणि हायकिंग करणाऱ्यांसाठी डिझाइन केले आहे. याद्वारे तुम्ही तुमचा स्मार्टफोनच नाही तर डिजिटल कॅमेरा आणि लॅपटॉपही चार्ज करू शकता.
Ambrane Stylo Max Powerbank ब्लु आणि ब्लॅक या दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. कंपनी यावर 180 दिवसांची वॉरंटी देत आहे. हे डिवाइस ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदी करता येईल. कंपनीने त्याची किंमत 3,999 रुपये ठेवली आहे.
हे उपकरण मजबूत बॉडी आणि 9 लेयर चिपसेट प्रोटेक्शनसह सुसज्ज आहे, ज्यामुळे ओवरहीटिंग आणि शॉर्ट सर्किट होणार नाही. एकाच वेळी अनेक उपकरणे चार्ज करण्यासाठी यात दोन USB आणि एक टाइप-C पोर्ट आहे.
यामध्ये दिलेली 50,000 mAh लिथियम-पॉलिमर बॅटरी 20W पॉवर आउटपुटला सपोर्ट करते, ज्याद्वारे तुम्हाला फास्ट चार्जिंगची सुविधा मिळेल. पॉवर बँक स्वतः 18W रॅपिड चार्जिंगला देखील सपोर्ट करते आणि त्वरीत चार्ज होते.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.