अॅमेझॉन लवकरच बाजारात आपला अजून एक नवीन प्रीमियम किंडल डिवाइस लाँच करणार आहे. अॅमेझॉनच्या CO जेफ बेजोसने एका ट्वीटमध्ये ह्या नवीन डिवाइस विषयी माहिती दिली आहे. ह्या ट्वीटमध्ये असे सांगितले गेले आहे की, “तयार व्हा, पुर्णपणे नवीन आणि आठव्या जेनरेशन प्रीमियम किंडलसाठी. पुर्ण माहिती मिळेल पुढील आठवड्यात.”
हा नवीन डिवाइस २०१४ मध्ये लाँच केल्या गेलेल्या किंडल वॉईज ई बुक रीडरची जागा घेईल. बेजोसने अशीही माहिती दिली आहे की, हा नवीन डिवाइस ह्या लोकप्रिय ई बुक रीडरची ८वी जेनरेशन असेल.
https://twitter.com/JeffBezos/status/717033781589204992
२०१४ मध्ये लाँच केल्या गेलेल्या किंडल वॉईज पेपरव्हाइटच्या तुलनेत हा खूपच पातळ आणि हलका आहे. वायफाय असलेल्या ह्या किंडल वॉईजची किंमत १६,४९९ रुपये आहे. परंतू वायफाय+ 3G व्हर्जन असलेला किंडल वॉईज २०,४९९ रुपयात लाँच केला गेला होता. किंडल वॉईजमध्ये कॅपेसिटीव्ह पेज-टर्न बटन्स आहेत.
हेदेखील वाचा – कमी किंमतीतही उत्कृष्ट कॅमेरा रिझोल्युशन देतात हे कॅनन डिजिटल कॅमेरे
हेदेखील वाचा – ड्यूल कॅमे-याने सुसज्ज असलेला हुआवे P9, P9 प्लस स्मार्टफोन लाँच