निम्म्या किमतीत मिळतेय Amazon Prime मेम्बरशिप, मनसोक्त बघा चित्रपट आणि सिरीज

Updated on 19-May-2023
HIGHLIGHTS

Amazon ने Prime Youth ऑफर आणली आहे.

तरुणांना 750 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

18-24 वर्षांच्या तरुणांसाठी ही ऑफर आणली गेली आहे.

अलीकडेच Amazon ने आपल्या प्राईम मेम्बरशिपची किंमत वाढवली आहे. मात्र, कंपनीने केवळ मासिक आणि त्रैमासिक सब्स्क्रिप्शन प्लॅन्सची किमंत वाढवली आहे. पण वार्षिक प्लॅनच्या किमतीत कोणतेही बदल झालेले नाही. पण आता एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने तरुणाईसाठी Prime Youth ऑफर आणली आहे. यामध्ये तुम्हाला मोठी कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. 

Amazon Prime Youth ऑफर

Amazon Prime Youth ऑफरमध्ये ग्राहकांना दोन ऑप्शन्स मिळणार आहेत. पहिले म्हणजे प्राइम मेंबरशिपची 30 दिवसांची मोफत चाचणी घ्या. तर दुसरे म्हणजे 50% कॅशबॅक ऑफरचा लाभ घेता येईल. जर तुम्ही मोफत प्राइम मेंबरशिप निवडल्यास, मोफत चाचणीनंतर तुम्हाला 1,499 रुपये आकारले जातील. मात्र, तरुणांना 750 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. 

कशी मिळवाल ऑफर ?

– Amazon प्राइम मेंबरशिप 50% सूट मिळवण्यासाठी Amazon Youth Offer पेज ओपन करा. 

– आता तुम्हाला 1,499 रुपयांमध्ये प्राईम असा पर्याय दिसेल. 

– हा पर्याय निवडा आणि पेमेंट मेथड सिलेक्ट करा. 

– सब्स्क्रिप्शनसाठी ID कार्ड आणि एक फोटो अपलोड करा.  

– प्राइमचे सदस्यत्व घेतल्यानंतर 15 दिवसांच्या आत ही स्टेप पूर्ण करा. तुम्ही अयशस्वी झाल्यास ऑफर कॅन्सल होईल.

लक्षात घ्या :

या ऑफरसाठी पात्र होण्यासाठी तरुण 18-24 वर्षांच्या वयाचे असावेत. प्राइममध्ये सामील झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत तुमच्या वयाची पडताळणी झाल्यास ऑफरचा लाभ घेता येईल. Amazon तुमच्या वयाची पडताळणी कागदपत्रांद्वारे करेल, जे तुम्ही डिलिव्हरीच्या वेळी सबमिट केले असतील. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :