प्रेक्षकांना महागाईचा फटका! Amazon Prime Video मध्ये मोठा बदल, आता द्यावे लागतील जास्त पैसे। Tech News 

प्रेक्षकांना महागाईचा फटका! Amazon Prime Video मध्ये मोठा बदल, आता द्यावे लागतील जास्त पैसे। Tech News 
HIGHLIGHTS

Amazon Prime Video युजर्ससाठी एक चिंताजनक बातमी आहे.

आता या सबस्क्रिप्शनची किंमत वाढणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

Netflix च्या तुलनेत Prime Video प्लॅटफॉर्म खूपच परवडणारा मानला जातो.

Amazon Prime Video हे भारतीय प्रेक्षकांचे एक लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. Netflix च्या तुलनेत हा प्लॅटफॉर्म खूपच परवडणारा मानला जातो. पण, Amazon Prime युजर्ससाठी एक चिंताजनक बातमी आहे. कारण, आता या सबस्क्रिप्शनची किंमत वाढणार असल्याचे पुढे आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, 29 जानेवारीपासून नव्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयानंतर वापरकर्त्यांना अतिरिक्त पेमेंट करावे लागणार आहे. चला तर मग याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊयात.

हे सुद्धा वाचा: बेस्ट सेलिंग बजेट स्मार्टफोन POCO C51 अगदी निम्म्या किमतीत खरेदी करा, जाणून घ्या Best ऑफर। Tech News

Amazon Prime video

Prime Video साठी द्यावे लागणार जास्त पैसे

Amazon Prime Video वापरकर्त्यांना अतिरिक्त पेमेंट करण्यास सांगितले गेले आहे. जर एखाद्याने अतिरिक्त पैसे दिले नाहीत, तर 29 जानेवारीपासून त्याला Video कंटेंटमध्ये अधूनमधून जाहिराती दाखवल्या जातील. हा बदल सध्या अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि कॅनडामध्ये सुरू होणार आहे. मात्र, हा बदल भारतात कधी होणार? किंवा होणार की नाही? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

जर तुम्ही Amazon Prime Video चे जुने सदस्य असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. खरं तर, जुन्या सदस्यांना अतिरिक्त पेमेंटसाठी ईमेल प्राप्त होईल. अमेरिकेत जुन्या सदस्यांना दरमहा US $ 2.99 भरावे लागतील.

PRIME VIDEO

Prime Video चे बेनिफिट्स

आता अनेक वर्षांनी Prime Video मध्ये अनेक फायदे समाविष्ट करण्यात आले आहेत. एका दिवसाच्या डिलिव्हरीपासून ते बऱ्याच Amazon प्रोडक्ट डिल्समध्ये लवकर ऍक्सेस मिळतो. आता यामध्ये Prime Video , प्राइम म्युझिक, गेमिंग आणि प्राइम डे सेलचा समावेश आहे. प्राइम व्हिडिओमध्ये तुम्ही अनेक उत्कृष्ट चित्रपट, पुरस्कार विजेते, Amazon ओरिजनल, वेब सिरीज आणि टीव्ही सिरीज इ. पाहू शकता.

एवढेच नाही तर, तुम्हाला केवळ देशी नाही तर विदेशी सामग्री देखील या प्लॅटफॉर्मवर बघायला मिळणार आहे. होय, Prime Video वर अनेक विदेशी म्हणजेच हॉलीवूड, कोरियन इ. लव्ह रोमान्स, थ्रिलर, हॉरर इ. सामग्रीचा लाभ घेता येतो. त्यामुळे Prime Video हे OTT प्लॅटफॉर्म भारतीयांचे आवडत्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo