Amazon Prime Video च्या ग्राहकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. सिनेरसिकांच्या खिशावर आता जास्त ताण पडणार आहे. कारण Amazonने आपल्या Prime Video प्लॅनच्या किंमती गुपचूपपणे वाढवल्या आहेत. मात्र, यात देखील ग्राहकांना एक दिलासा मिळाला आहे. कसे ? ते बघा –
कंपनी Prime Video सबस्क्रिप्शनसाठी चार प्लॅन ऑफर करते. यामध्ये मंथली, 3 महिने, वार्षिक आणि काही इतर प्लॅन्सचा समावेश आहे. आता या प्लॅन्सच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
मंथली प्लॅन : Amazon प्राइम मेंबरशिपच्या मंथली प्लॅनची किंमत पूर्वी 179 रुपये होती. पण आता त्याची किंमत 299 रुपये झाली आहे. मंथली प्लॅनची किमंत एकूण 120 रुपयांनी महागली आहे.
त्रैमासिक प्लॅन : Amazon Prime Video च्या 3 महिन्यांच्या प्लॅनची किंमत आधी 459 रुपये होती. या प्लॅनची नवीन किंमत 599 रुपये आहे. या प्लॅनची किमंत 140 रुपयांनी महागली आहे.
वार्षिक प्लॅन : ग्राहकांसाठी यात एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने वार्षिक प्लॅनच्या किंमतीत कोणतीही वाढ केलेली नाही, म्हणजेच जर तुम्ही एक वर्षाचा प्लॅन घेतला तर हा प्लॅन आजही 1,499 रुपयांचा आहे.
कंपनीने Amazon Prime Lite च्या वार्षिक प्लॅनच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. हा प्लॅन 999 रुपयांचा आहे. कंपनीने ग्राहकांना दिलासा म्हणून वार्षिक प्लॅन्सच्या किमतीत कोणतीही वाढ केलेली नाही.