digit zero1 awards

Prime Video: फेब्रुवारीमध्ये मिळेल थ्रिलर-सस्पेन्सचा डबल डोस, नवीन सिरीज आणि चित्रपट होणार रिलीज

Prime Video:  फेब्रुवारीमध्ये मिळेल थ्रिलर-सस्पेन्सचा डबल डोस, नवीन सिरीज आणि चित्रपट होणार रिलीज
HIGHLIGHTS

Amazon Prime Video वर या महिन्यात रिलीज होणारे चित्रपट आणि सिरीज

थ्रिलर आणि सस्पेन्सचा मिळेल डबल डोज

काही चित्रपट आणि सिरीजसाठी द्यावे लागेल रेंट

आजच्या युगात, प्रेक्षक थिएटरपेक्षा घरी बसून मनोरंजन करणे पसंत करतात. यासाठी प्रेक्षकांकडे OTT हे उत्तम साधन आहे, ज्यावर ते आवडीनुसार चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकतात. OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रेक्षकांना फेब्रुवारी महिन्यात काहीतरी खास पाहायला मिळेल. या महिन्यात अनेक उत्तमोत्तम चित्रपट आणि वेब सिरीज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अशा परिस्थितीत, फेब्रुवारीमध्ये Amazon प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार्‍या चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल जाणून घेऊया… 

हे सुद्धा वाचा : Airtel आणि VIचे पैसावसूल प्लॅन्स, स्वस्तात मिळेल OTTची भरपूर मजा

फर्जी 

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर 'फर्जी' या वेब सीरिजद्वारे OTT विश्वात पदार्पण करत आहे. यामध्ये शाहिदसोबत साऊथ सिनेमाचा सुपरस्टार विजय सेतुपती आणि अभिनेत्री राशि खन्ना देखील दिसणार आहेत. त्याबरोबरच, केके मेननही यात दिसणार आहे. या वेब सिरीजचे दिग्दर्शन राज आणि डीके यांनी केले आहे, ज्यांनी यापूर्वी 'फॅमिली मॅन'चे दोन्ही सीझन दिग्दर्शित केले आहेत. 'फर्जी' 10 फेब्रुवारीला Amazon प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.

बस कर बस्सी 

Amazon Prime Video हा स्टँडअप स्पेशल शो 'बास कर बस्सी' रिलीज झाला आहे. ज्यात भारतातील सर्वात प्रिय कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी आहेत. बस्सी क्लासिक, विनोदी अवतारात दिसणार आहे. यादरम्यान अनुभव बस्सी त्यांच्या आयुष्यातील कथांमधून प्रेक्षकांना त्यांच्या जुन्या काळात घेऊन जाणार आहेत.

बारिश

वारिसू हा एक भारतीय तमिळ भाषेतील चित्रपट आहे, ज्याची हिंदी डब केलेली आवृत्ती 'बारिश' असे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वामशी पैडिपल्ली यांनी केले आहे. या चित्रपटात विजय आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. हे 22 फेब्रुवारीला Amazon Prime Video वर रिलीज होईल. तो तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

या कॉन्टेन्टसाठी रेंट द्यावे लागेल.  

पैसे भरल्यानंतर काही चित्रपट आणि शो पाहण्यासाठी उपलब्ध असतील. यामध्ये अनेक चित्रपटांचा समावेश आहे.  'नथिंग इज इम्पॉसिबल' 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. 'फॅमिली कॅम्प' 16 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. 'साल्वाटोर: शूमेकर ऑफ ड्रीम्स' 21 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. 'लिजन ऑफ सुपर हिरोज' 22 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo