सिनेरसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Amazon Prime Video भारतातील लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म्समधून एक आहे. या प्लॅटफॉर्मचे लवकरच स्वस्त सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच होणार आहेत. खरं तर, Amazon आता जाहिरातींसह असलेले स्वस्त प्लॅन आणण्याच्या तयारीत आहे, असे वृत्त आहे. म्हणजेच तुम्हाला या प्लॅन्ससोबत कंटेंटसह जाहिराती देखील पाहायला मिळतील. अलीकडेच, Netflixने ऍड-सपोर्टिव्ह प्लॅनबद्दल चर्चा सुरु केली आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, Amazon प्राइम व्हिडिओवर स्पोर्ट्सच्या जाहिराती पूर्वीपासून येत असतात.एका वृत्तानुसार, डिस्कव्हरी आणि पॅरामाउंट ग्लोबलने Amazon शी जाहिरात आधारित प्लॅन्ससाठी चर्चा केली आहे.
Amazon कडे Amazon prime lite म्हणून सर्वात स्वस्त प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये एक वर्षाची वैधता देण्यात आली आहे. या प्लॅनची किमंत 999 रुपये आहे. या प्लॅनमधील बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, ऍमेझॉन म्युझिक व्यतिरिक्त प्राइमचे सर्व बेनिफिट्स यात मिळणार आहेत. तसेच, या प्लॅनमध्ये जाहिराती देखील दिसतात.
अलीकडेच, लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म्सना चांगलीच स्पर्धा देण्यासाठी JioCinema हे नवीन OTT प्लॅटफॉर्म लाँच झाले आहे. JioCinema कडे फक्त एकच प्लॅन आहे, ज्याची किंमत 999 रुपये आहे. या प्लॅनमध्ये JioCinema चा प्रीमियम अॅक्सेस मिळेल.