Amazon Prime Video युजर्सना बसेल धक्का! नवीन वर्षापासून द्यावे लागतील तब्बल 250 रुपये Extra। Tech News

Updated on 28-Dec-2023
HIGHLIGHTS

जानेवारी 2024 पासून Amazon Prime Video वर जाहिराती दाखवल्या जातील.

Prime Video मोबाइल सबस्क्रिप्शनची किंमत 599 रुपये इतकी आहे.

ऍड-फ्री सर्व्हिससाठी महिन्याला सुमारे 250 रुपये एक्सट्रा द्यावे लागतील.

सिनेरसिक आणि OTT लव्हर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही Amazon Prime Video वापरत असाल तर तुम्हाला महागाईचा झटका बसणार आहे. कारण जानेवारी 2024 पासून Amazon Prime Video वर जाहिराती दाखवल्या जातील. मात्र, वापरकर्त्यांना लिनियर टीव्ही आणि इतर स्ट्रीमिंग सेवांच्या तुलनेत कमी जाहिराती दिसतील, असे सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा: Absolutely Lowest! 256GB सह सर्वात स्वस्त Itel A70 स्मार्टफोनचे भारतीय लाँच कन्फर्म, टीझर Amazon वर LIVE

ऍड-फ्री सर्व्हिस

वर सांगितल्याप्रमाणे, Amazon Prime Video वर जर तुम्हाला जाहिराती पाहायच्या नसतील तर तुम्हाला ऍड-फ्री सर्व्हिस ऍक्टिव्ह करावी लागेल. यासाठी तुम्हाला महिन्याला सुमारे 250 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. हे शुल्क नवीन वर्षापासून म्हणजेच जानेवारी 2024 पासून लागू केले जाण्याची शक्यता आहे.

अलीकडेच आलेल्या रिपोर्टनुसार, 29 जानेवारीपासून अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि कॅनडामध्ये Amazon Prime Video वर जाहिराती दाखवण्यास सुरुवात होईल. मात्र, सध्या ही ऍड-फ्री सर्व्हिस भारतात सुरू होणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Amazon Prime Video चे सबस्क्रिप्शन

Amazon Prime Video च्या वार्षिक सबस्क्रिप्शनची किंमत 1,499 रुपये आहे. हे सबस्क्रिप्शन मोफत डिलिव्हरीसह प्राइम म्युझिक, प्राइम गेमिंग आणि प्राइम रीडिंग ऑफर करते. ही सेवा अमेरिकेसारख्या बाजारपेठेत उपलब्ध आहे. तर, Amazon प्राइम लाइट भारतात Amazon ने ऑफर केले आहे. या प्लॅनची मासिक किंमत 799 रुपये इतकी आहे. तर, Prime Video मोबाइल सबस्क्रिप्शनची किंमत 599 रुपये इतकी आहे. जी प्राइम व्हिडिओ App द्वारे स्मार्टफोन किंवा टॅबलेटवर सर्व कंटेंटचा ऍक्सेस देते.

आम्ही तुम्हाला सांगतो की, Amazon Prime Video भारतात खूप लोकप्रिय आहे. प्राइम व्हिडिओ 4K रिझोल्यूशनमध्ये चित्रपट आणि टीव्ही शो ऑफर करते. ही सेवा स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्हीवर उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :