Amazon प्राइम मेंबरशिप ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे ऑफर केलेली सर्वोत्तम सेवा आहे. सबस्क्रिप्शनसह, तुम्हाला उत्कृष्ट फीचर्स आणि बऱ्याच सर्व्हिस मिळतात. Amazon Prime सह, तुम्हाला प्राइम-एक्सक्लुझिव्ह डील, प्राइम व्हिडिओ सबस्क्रिप्शन, प्राइम म्युझिक सबस्क्रिप्शन, फ्री एक्सप्रेस डिलिव्हरी इ. बेनिफिट मिळेल.
आज आम्ही Amazon प्राइम प्लॅन्सबद्दल माहिती देणार आहोत, अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडता येईल. Amazon मंथली, त्रैमासिक आणि वार्षिक योजना वेगवेगळ्या किंमतींमध्ये ऑफर करतो. सर्व योजना समान बेनिफिटसह येतात. मासिक योजनेच्या तुलनेत वार्षिक योजनेत तुमची अधिक बचत होईल. 12 महिन्यांच्या प्लॅनमध्ये तुम्ही सुमारे 650 रुपये वाचवू शकता.
हे सुद्धा वाचा : Snapdragon 8 Gen 1 SoC द्वारे समर्थित OnePlus 10 लवकरच लाँच होईल, बघा फीचर्स
AMAZON चा 179 रुपयांच्या प्लॅन एका महिन्याच्या सवलतीसह उपलब्ध आहे. जिथे वापरकर्त्यांना दरमहा ही रक्कम भरावी लागेल. प्लॅनमध्ये, तुम्हाला एक ते दोन दिवसांत प्रोडक्ट डिलिव्हरी, Amazon प्राइम व्हिडिओचा ऍक्सेस, प्राइम म्युझिकचा ऍक्सेस आणि त्याबरोबरच विशेष सवलतीचा लाभ मिळतो.
AMAZON चा 459 रुपयांचा प्लॅन तीन महिन्यांच्या वैधतेसह उपलब्ध आहे.या प्लॅनमध्ये अमेझॉन प्राइमची वैशिष्ट्ये जसे प्राइम म्युझिक,स्पेशल डिस्काउंट, निवडक उत्पादनांची एक ते दोन दिवसांत डिलिव्हरी इ. मासिक प्लॅनच्या तुलनेत या प्लॅनमध्ये तुमचे दरमहा 78 रुपये वाचतात.
Amazon Prime च्या 1,499 रुपयांच्या या प्लॅनची वैधता वर्षभरासाठी उपलब्ध आहे. Amazon Prime चा हा प्लॅन सर्वोत्कृष्ट आहे. यात ग्राहकांना प्राइम मेंबरशिपचा लाभ मिळतो. त्रैमासिक प्लॅनच्या तुलनेत, हा प्लॅन संपूर्ण वर्षामध्ये 337 रुपयांची बचत देतो. तर मासिक योजनेच्या तुलनेत 649 रुपयांची बचत होईल. तुम्ही नेहमी Amazon प्राइम सेवांचा लाभ घेत असाल, तर ही योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल.