अखेर अॅमेझॉनने भारतात आपली प्राइम सब्सक्रिप्शन सेवा लाँच केलीच. ह्यासाठी आपल्याला अॅमेझॉन वेबसाइटवर जाऊन साइन अप करावे लागेल, येथे आपल्याला पहिल्या ६० दिवसांसाठी मोफत मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला ४९९ रुपये मोजावे लागतील. आपल्याला १ वर्षाची ही रक्कम मोजावी लागेल, मात्र ह्याची मूळ किंमतीवर लक्ष दिले तर, भारतात वर्षाला ९९९ रुपये मोजावे लागतील.
ह्यावरुन तरी आपल्याला ह्या सेवेच्या किंमतीबाबत कल्पना आलीच असेल. पण नेमकी ही सेवा आहे तरी काय? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ही एक अशी सेवा जी भारतात अलीकडेच एक दिवस आणि दोन दिवसाच्या कोणत्याही कमीत कमी ऑर्डरच्या डिलिवरीसाठी लाँच केले आहे. ह्याच्या माध्यमातून आपण खूप सहजतेने कोणतीही डिल करु शकता.
हेदेखील वाचा – ह्या १० आकर्षक स्मार्टफोन्सवर मिळतेय सर्वात मोठी बंपर सूट…
जो कोणता सेल अॅमेझॉनवर येईल, त्यावर तुम्हाला सर्वात आधी सहभागी होण्याची संधी दिली जाईल. त्याचबरोबर काही महत्त्वांच्या सदस्यांना खास सेलमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर आपल्याला अॅमेझॉन व्हिडियो आणि अॅमेझॉन म्यूजिक सेवेचा सुद्धा ह्यात लाभ घेऊ शकता. तथापि, ह्या दोन्हीही सेवा सध्या भारतात उपलब्ध नाही. मात्र लवकरच ह्या सेवा सुरु केल्या जातील. अॅमेझॉन सांगितले आहे की, लवकरच ह्या सेवा भारतात सुरु केल्या जातील.
हेदेखील वाचा – पुढील ३ महिन्यात सुरु होणार रिलायन्स जिओ 4G सेवा: CLSA
हेदेखील वाचा – जगातील पहिला लिक्विड कूल्ड लॅपटॉप आसूस ROG GX700 भारतात लाँच