Amazon युजर्सची मज्जाच मजा! लवकरच सुरु होणार वर्षातील सर्वात मोठी सेल, Best ऑफर्सचा होणार वर्षाव 

Amazon युजर्सची मज्जाच मजा! लवकरच सुरु होणार वर्षातील सर्वात मोठी सेल, Best ऑफर्सचा होणार वर्षाव 
HIGHLIGHTS

Amazon Prime Day 2024 सेलची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

ही सेल केवळ दोन दिवसांसाठी फक्त Amazon Prime सदस्यांपुरता मर्यादित असेल.

प्राइम डे सेल दरम्यान प्रोडक्ट्स निवडक बँक कार्ड्ससह 10% सूट मिळेल.

Amazon ने वर्षातील सर्वात मोठ्या सेलचे आयोजन केले आहे. होय, Amazon Prime Day 2024 सेलची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही सेल जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, दरवर्षीप्रमाणे ही सेल केवळ दोन दिवसांसाठी फक्त Amazon Prime सदस्यांपुरता मर्यादित असेल. लक्षात घ्या की, या सेलमध्ये टॉप स्मार्टफोनसह अनेक प्रोडक्ट्सवर डिस्काउंट आणि ऑफर्स उपलब्ध असतील.

याव्यतिरिक्त, Amazon ने खरेदीवर अतिरिक्त सवलत देण्यासाठी निवडक बँका आणि इतर सर्वांसोबत सहकार्य केले आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Amazon Prime Day 2024 सेलबद्दल सर्व डिटेल्स-

Amazon Prime Day 2024 सेल डेट्स

Amazon ने जाहीर केले आहे की, लोकप्रिय Amazon Prime Day 2024 सेलची आठवी आवृत्ती शनिवार 20 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजता सुरू होईल आणि 21 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजतापर्यंत लाईव्ह असेल. या 48 तासांच्या सेल इव्हेंटमध्ये नवीन प्रोडक्ट लाँच केले जातील.

Amazon Prime Day sale starts from 20 July 2024
Amazon Prime Day sale starts from 20 July 2024

या सेलमध्ये प्रोडक्ट डिस्काउंट तसेच बँक कार्ड ऑफर आहेत. प्राइम डे सेल दरम्यान तुम्हाला प्रोडक्ट्स 10% सूट ICICI आणि SBI क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे उपलब्ध असेल. Amazon Pay ICICI बँकेबद्दल बोलायचे झाल्यास, त्यावर 5% कॅशबॅक ऑफर उपलब्ध आहे.

Amazon Prime Day 2024 सेलचा लाभ घेण्यासाठी काय कराल?

नावावरून समजलेच असेल की, Amazon प्राइम डे सेल 2024 हा केवळ प्राइम सदस्यांसाठी एक विशेष कार्यक्रम आहे. या डिस्काउंट सेलमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही प्राइम मेंबरशिप खरेदी करावी लागेल. जर तुम्ही आधीपासून प्राइम सदस्य नाहीत, तर तुम्ही सेलचा लाभ घेण्यासाठी 30-दिवसांची विनामूल्य चाचणी (ट्रायल) देखील घेऊ शकता.

Amazon Prime मेंबरशिप

  • भारतात प्राइम मेंबरशिपची सुरुवातीची किंमत 299 रुपये प्रति महिना आहे.
  • तीन महिन्यांसाठी मेंबरशिप तुम्ही 599 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
  • Amazon Prime मेंबरशिपसाठी वर्षभराच्या प्लॅनची किंमत 1,499 रुपये आहे.
  • कंपनीकडे 12 महिन्यांसाठी Amazon प्राइम शॉपिंग एडिशन प्लॅन आहे, ज्याची किंमत 399 रुपये आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, प्राइम सदस्य पात्र वस्तूंवर फास्ट डिलिव्हरी म्हणजेच जलद वितरणाचा लाभ घेऊ शकतात. Amazon प्राइम व्हिडिओवर नवीनतम टीव्ही शो आणि चित्रपट स्ट्रीम करू शकतात, प्राइम म्युझिक आणि प्राइम रीडिंगमध्ये ऍक्सेस मिळवू शकतात. तसेच, निवडक डील्सचे विशेष ऍक्सेस आणि बरेच बेनिफिट्स यात उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo