तयार रहा ! Amazon प्राइम डे सेल 2022 ‘या’ तारखेला होणार सुरू; जोरदार सवलत, कॅशबॅक आणि आकर्षक डिल्स

Updated on 30-Jun-2022
HIGHLIGHTS

12 आणि 13 जुलै रोजी Amazon प्राइम डे सेल 2022

TV, लॅपटॉप, मोबाईलपासून वेअरेबलपर्यंतच्या शेकडो उत्पादनांवर विशेष ऑफर

सॅमसंग, ऍप्पल ब्रँडवर मिळतील उत्तम डिल्स

Amazon Prime Day Sale 2022 ला आता फक्त दोन आठवडे उरले आहेत, पण सेल सुरू होण्यापूर्वीच सेलशी संबंधित बरीच माहिती इंटरनेटवर लीक झाली आहे. हा दोन दिवसीय सेल 12 आणि 13 जुलै रोजी होणार आहे. या सेलमध्ये प्राइम सदस्यांना टीव्ही, लॅपटॉप, मोबाईलपासून वेअरेबलपर्यंतच्या शेकडो उत्पादनांवर विशेष ऑफर मिळतील. यासोबतच प्राईम सदस्य नसलेल्यांसाठीही अनेक सवलती असतील.

हे सुद्धा वाचा : HTC Desire 22 Pro: जगातील पहिला Metaverse फोन लाँच, जाणून घ्या स्मार्टफोनची विशेषता

Samsung Galaxy S22 पासून Apple MacBook Pro आणि Apple Watch SE पर्यंत, येथे 5 सर्वोत्तम प्राइम डे 2022 डिल्स आहेत :

Amazon प्राइम डे सेलचे बेस्ट डिल्स

 – Samsung चा Galaxy S22 हा या वर्षाच्या सुरुवातीला लाँच झालेला फ्लॅगशिप फोन आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऍमेझॉन प्राइम डे सेल 2022 दरम्यान हँडसेट $100 म्हणजेच अंदाजे 7,889 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध असेल. 

– तसेच, S22 Ultra देखील $247 म्हणजेच अंदाजे 19,487 रुपयांच्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध असेल.

– Samsung Galaxy Z Flip 3 5G वर $300 म्हणजेच अंदाजे  23,669 रुपयांची सूट आहे. तुम्ही फोल्डेबल स्मार्टफोनचे चाहते असाल, तर तुम्ही हा ही डील अजिबात चुकवू नका. गॅलेक्सी Z फ्लिप 3 सर्वात कमी किमतीत उपलब्ध असणार आहे.

– Apple MacBook Pro (16-इंच, M1 Pro) $200 म्हणजेच अंदाजे 15,779 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध असेल. 

– Apple Watch SE वर तुम्हाला $40 म्हणजेच अंदाजे  3,155 रुपयांची सूट मिळू शकते. Apple Watch SE फिटनेस आणि ऍक्टिव्हिटी ट्रॅकर, हार्ट रेट मॉनिटर, रेटिना डिस्प्ले आणि वॉटर रेझिस्टंट फीचर्ससह येते. ही वॉच सर्वोत्तम स्मार्टवॉचपैकी एक आहे.

वरील सर्व उपकरणांवरील किंमती लीक झालेल्या अहवालांवरून मिळालेल्या आहेत, ऑफरबाबत अचूक माहिती विक्री सुरू झाल्यानंतरच उपलब्ध होईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :