अवघ्या काही दिवसांनंतर Amazon प्राइम डे सेल सुरु होणार आहे. यामध्ये, तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही स्मार्टफोन बंपर डिस्काउंट आणि उत्तम ऑफर्ससह खरेदी करू शकता. सेल दरम्यान, तुम्हाला स्मार्टफोनवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे, याशिवाय तुम्हाला नो कॉस्ट EMI, एक्सचेंज ऑफर, स्क्रीन रिप्लेसमेंट आणि कूपन इत्यादींचाही लाभ मिळणार आहे. ई-कॉमर्स वेबसाइटने पुष्टी केली आहे की, ऍमेझॉन प्राइम डे सेल 23 जुलै ते 24 जुलै दरम्यान भारतात होईल. या विक्रीदरम्यान, Amazon स्मार्टफोन, कंन्ज्युमर इलेक्ट्रॉनिक्स, TV , उपकरणे, फॅशन आणि सौंदर्य, ग्रोसरी , Amazon डिव्हाइसेस, घर आणि स्वयंपाकघरातील वस्तू, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणि बरेच काही यावर सर्वोत्कृष्ट डील्स आणि ऑफर देत आहे.
हे सुद्धा वाचा : खुशखबर ! Netflix चे प्लॅन होणार स्वस्त, कमी दरात मिळणार सबस्क्रिप्शन, कंपनीची मोठी तयारी
जर तुम्ही या सेलबद्दल खूप उत्सुक असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, प्राइम डे सेल केवळ Amazon प्राइम ग्राहकांसाठी असणार आहे. नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऍमेझॉन दरवर्षी प्राइम डे सेलचे आयोजन करते. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रवेश प्रदान करण्याव्यतिरिक्त, प्राइम डे सदस्यांना विशेष सवलत, फास्ट डिलिव्हरी आणि इतर लाभ देखील मिळतात.
Amazon प्राइम डे सेल 22 जुलै रोजी दुपारी 12:00 ते 24 जुलै रोजी रात्री 11:59 पर्यंत चालेल.
Amazon प्राइम डे सेल दरम्यान सॅमसंग, शाओमी, बोट, इंटेल, लेनोवो, सोनी, बजाज, युरेका फोर्ब्स, प्यूमा, आदिदास, USPA, मॅक्स सारख्या 400 हून अधिक टॉप भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्समधील 30,000+ अधिक नवीन प्रोडक्ट्स असतील. यामध्ये वर नमूद केलेल्या ब्रँड्स तसेच Asics, Fastrack, Tresemme, Mamaearth, Surf Excel, Dabur, Colgate, Whirlpool, IFB इत्यादींचा समावेश आहे. प्राइम मेंबर्ससाठी या सेलमध्ये हे सर्व ब्रँड आणि प्रोडक्ट्स सर्वोत्तम किंमत आणि आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध होणार आहेत.
प्राइम सदस्यांना स्मार्टफोन, कंन्ज्युमर इलेक्ट्रॉनिक्स, उपकरणे, टीव्ही, किचन, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू, खेळणी, फॅशन, सौंदर्य आणि बरेच काही यावर उत्तम ऑफर्स मिळतील.
Amazon या प्राइम डे वर Amazon Echo, Fire TV आणि Kindles डिव्हाइसेसवर विशेष डील्स ऑफर करणार आहे. लेटेस्ट स्मार्ट स्पीकर, स्मार्ट डिस्प्ले आणि फायर टीव्ही उत्पादनांवर 55 टक्के सूट मिळेल.
सेल दरम्यान या सवलतीव्यतिरिक्त, तुम्हाला बँक ऑफर देखील मिळणार आहेत. ICICI बँक आणि SBI बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून किंवा EMI द्वारे, तुम्ही 10% पर्यंत बचत करू शकता. या सेल दरम्यान, तुम्हाला उत्तम डील्स, ब्लॉकबस्टर मनोरंजन आणि नवीन लॉन्च इत्यादी पाहायला मिळणार आहेत.