Amazon प्राइम सदस्यांसाठी आनंदाची बातमी! कंपनीने यूजर्सना दिली एक मोठी भेट
Amazon ने शफल मोडमध्ये 100 दशलक्ष गाणी आपल्या प्राइम सदस्यांना उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.
तसेच, नवीन वैशिष्ट्ये आणि जाहिरात-मुक्त कन्टेंट उपलब्ध करून दिला आहे.
कंपनीने प्राइम सदस्यांसाठी आपला संगीत कॅटलॉग दोन दशलक्ष ते 100 दशलक्ष गाण्यांपर्यंत वाढवला आहे.
Amazon ने शफल मोडमध्ये 100 दशलक्ष गाणी आपल्या प्राइम सदस्यांना उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. तसेच, ऐकण्याचा उत्तम अनुभव घेण्यासाठी नवीन फीचर्स आणि जाहिरात-मुक्त कंटेंट उपलब्ध करून दिला आहे. कंपनीने प्राइम सदस्यांसाठी आपला म्युझिक कॅटलॉग दोन दशलक्ष ते 100 दशलक्ष गाण्यांपर्यंत वाढवला आहे.
हे सुद्धा वाचा : अप्रतिम डिझाइनसह NOKIA ने लाँच केला नवीन फोन, जाणून घ्या 'या' फ्लिप फीचर फोनची किंमत
कंपनीने एका ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे की, सदस्य आता त्यांच्या आवडीचे संगीत आणि पॉडकास्ट पाहू शकतात. प्लॅटफॉर्मवर प्लेलिस्टचा संग्रह ऐकण्याची परवानगी आहे आणि ऑफलाइन ऐकण्यासाठी डाउनलोड सुविधा देखील उपलब्ध आहे.
प्राइम सदस्य आता ट्रेंडिंग पॉडकास्ट आणि मागणीनुसार उपलब्ध नवीन ऍमेझॉन एक्सक्लुझिव्ह शो ऐकू शकतात. याव्यतिरिक्त, कंपनी सर्व शैलींमध्ये त्यांचे विशेष पॉडकास्ट ऑफर करते. कंपनीने सांगितले की, श्रोत्यांना सुधारित ऍमेझॉन म्युझिक ऍप आणि नवीन 'पॉडकास्ट प्रिव्हयु' फिचर दिसेल.
पॉडकास्ट प्रिव्हयु 'वैशिष्ट्यीकृत क्लिप' सादर करतो, जे संभाव्य श्रोत्यांना पॉडकास्टची ओळख करून देणे आणि विद्यमान श्रोत्यांना नवीन आवडी शोधणे सोपे बनवण्याच्या उद्देशाने आहेत. याआधी, कंपनीने यूएस मधील वापरकर्त्यांसाठी निवडलेल्या पॉडकास्टवर ऑटो-जेनरेटेड, सिंक्रोनाइज्ड ट्रांसक्रिप्ट लाँच करण्याची घोषणा केली.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile